मनसेची उद्या शिवतीर्थावर महत्वाची बैठक; भोंग्यांबाबत भूमिका ठरणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mns important meeting at raj thackeray residence shivatirtha over loudspeakers row

मनसेची उद्या शिवतीर्थावर महत्वाची बैठक; भोंग्यांबाबत भूमिका ठरणार

राज्यात मशिदींवरील भोंग्यांवरून राजकारण चांगलेच तापले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी ३ मे रोजीचा अल्टीमेटम राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्य सरकारला दिला होता. मात्र, रविवारी औरंगाबादमध्ये झालेल्या सभेत त्यांनी ४ मे ही नवीन तारीख दिली. दरम्यान राज ठाकरे यांनी आज ट्विट करत मनसे सैनिकांना नवा आदेश दिला. यानंतर उद्या शिवतीर्थावर मनसेची महत्वाची बैठक बोलवण्यात आली आहे.

राज ठाकरे यांनी आज ट्विट करत, ‘उद्या (ता. ३) ईद आहे. रविवारच्या संभाजीनगरच्या सभेत त्याबाबतीत मी बोललो आहेच. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षय तृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका.आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे. त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचं; हे मी उद्या माझ्या ट्विटद्वारे आपल्यासमोर मांडेन.’ असे सांगितले होते

हेही वाचा: 'साधी विकास सोसायटी काढली नाही…'; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

राज ठाकरे यांनी उद्या निवडक पदअधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे. नेमकी पक्षाची भूमिका काय असेल ते पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली असल्याचे सांगण्यात येथ आहे. राज ठाकरे यांचे निवासस्थानी होणाऱ्या या बैठकीला निवडक पदाधिकारी आणि नेते या उपस्थित असणार आहेत. उद्या शिवतिर्थावर नऊ वाजता बैठक होणार आहे, आणि पुढील भूमिका या बैठकीनंतर राज ठाकरे जाहीर करणार आहेत.

हेही वाचा: इलॉन मस्कचे अर्ध्याहून अधिक ट्विटर फॉलोअर्स फेक; ऑनलाइन टूलचा दावा

तसेच अल्टिमेटम दिल्याप्रमाणे चार तारखेला मनसे कार्यकर्त्यांनी मशिदींसमोर भोंगे लावून हनुमान चालिसा म्हणू नये म्हणून मुंबई पोलिसांची मनसे कार्यकर्त्यांना कलम १८८ अंतर्गत नोटीस देखील पाठवली आहे.

Web Title: Mns Important Meeting At Raj Thackeray Residence Shivatirtha Over Loudspeakers Row

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top