इजिप्तमध्ये बस अपघातात 16 भारतीयांचा मृत्यू

वृत्तसंस्था
रविवार, 29 डिसेंबर 2019

इजिप्तमधील भारतीय दुतावासाने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. सूएझ शहर आणि कैरो येथील +20-1211299905 आणि +20-1283487779 हे दोन संपर्क क्रमांक प्रसिद्ध करण्यात आले आहेत. 

कैरो : इजिप्तमधील ऐन सोखाना शहराजवळ शनिवारी झालेल्या भीषण बस अपघातात 16 भारतीयांसह 22 जणांचा मृत्यू झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अल-अहराम या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ऐन सोखाना शहराजवळील दॅमिएता महामार्गावर भारतीय मजुरांना घेऊन जाणाऱ्या बसला ट्रकने धडक दिली. या अपघातात 16 भारतीय नागरिकांसह 22 जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात काही जण जखमी झाले असून, सुएझ शहरातील रुग्णालयामध्ये या पर्यटकांवर उपचार सुरु आहेत. 

इजिप्तमधील भारतीय दुतावासाने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. सूएझ शहर आणि कैरो येथील +20-1211299905 आणि +20-1283487779 हे दोन संपर्क क्रमांक प्रसिद्ध करण्यात आले आहेत. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 22 people were killed when a bus overturned in Egypt