esakal | चीनमधील हेनान प्रांतात अतिवृष्टी! पुरात 25 जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

चीनमधील हेनान प्रांतात अतिवृष्टी! पुरात 25 जणांचा मृत्यू

या भागात एक हजार वर्षांत यंदा प्रथमच अतिवृष्टी झाली आहे. या भागातील भुयारी मार्ग पाण्याने भरले आहे.

चीनमधील हेनान प्रांतात अतिवृष्टी! पुरात 25 जणांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

बीजिंग: चीनमधील मध्य हेनान प्रांतात बुधवारपासून पडत असलेल्या पावसाने पूर आला असून आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. या भागात एक हजार वर्षांत यंदा प्रथमच अतिवृष्टी झाली आहे. या भागातील भुयारी मार्ग पाण्याने भरले आहे. या मार्गात तसेच हॉटेल, सार्वजनिक स्थळी अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्याचा आदेश चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी सैन्यदलाला बुधवारी दिला.

हेही वाचा: हिंगोली जिल्ह्यातील सोळा मंडळात अतिवृष्टी, ५५.३० मिलिमीटर पाऊस

पाऊस व पुरामुळे एक लाख लोकांना सुरक्षित स्थळी पाठविण्यात आले आहे. आयुष्यात एकदाच घडणाऱ्या घटनेपैकी हा पूर असल्याचे वर्णन हवामान तज्ज्ञांनी केले आहे. या पुरामुळे झेंगझाऊ शहरात नासधूस झाल्याचे दिसत होते. येथील सर्व भागात 'पीपल्स लिबरेशन आर्मी'चे (पीएलए) सैनिक तैनात करण्याचा आदेश शी जिनपिंग यांनी दिला असून नागरिकांची सुरक्षा आणि मालमत्तेला सर्वोच्च प्रधान्य देण्याचे निर्देश दिले. यानुसार 'पीएएल'च्या सेंट्रल थिएटर कमांडने हेनान प्रांतात तातडीने सैनिकांच्या तुकड्या पाठविल्या.

हेही वाचा: वीज, अतिवृष्टी, पूरस्थितीत नागरिकांनी दक्षता घ्यावी!

चीनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये झेंगझाऊ स्थानकावरील मेट्रो रेल्वेत पुराचे पाणी शिरून प्रवाशांच्या गळ्यापर्यंत पोचल्याचे दिसत होते. तसेच गाडीत खांब किंवा अन्य वस्तूंचा आधार घेऊन प्रवासी मदतीच्या प्रतीक्षेत असल्याचेही यात पाहायला मिळाले. शहरातील वाहतुकीलाही फटका बसला असून अनेक बस मार्ग तात्पुरते बंद करण्यात आले होते. रेल्वे स्थानकावर १६० रेल्वे थांबविल्या तर येथील विमानतळावरील २६० विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. पोलिस, अग्निशमन दल आणि अन्य कर्मचाऱ्यांनी पूरग्रस्त भागात बचाव व शोध कार्य सुरू केल होते. भुयारी मार्गातील पाणी ओसरू लागले असून प्रवासी सुखरूप आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा: कोकणात अतिवृष्टी, घाटमाथ्यावर मुसळधार

हवामान विभागाच्या इतिहासातील विक्रमी पाऊस

झेंगझाऊ शहराच्या मध्यवर्ती भागात मंगळवारपासून (ता. २०) २४ तासांत ४५७.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. चीनमध्ये हवामानाच्या नोंदी ठेवण्यास सुरुवात झाली तेव्हापासूनचा हा सर्वांत मोठा पाऊस आहे, असे 'शिन्हुआ' या वृत्तसंस्थेने सांगितले. हेनान प्रांतात अनेक सांस्कृतिक स्थळे आहेत. उद्योग व शेती हे येथील मुख्य व्यवसाय आहे. बौद्ध भिख्खूंच्या मार्शल आर्टसाठी प्रसिद्ध असलेले शाओलिन मंदिराचेही पुरामुळे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा: मुंबईसह  कोकणातील सर्व जिल्ह्यात 4 दिवस होणार अतिवृष्टी ; हवामान खात्याचा इशारा

सुरक्षेसाठी धरण फोडले

झेंगझाऊ येथील पुरामुळे लुयांग शहरातील धरणाला २० मीटर लांबीचा तडा गेला असून धरण कोणत्याही क्षणी फुटण्याची भीती 'पीपल्स लिबरेशन आर्मी'ने 'सिना विबो' या सोशल मीडिया व्यासपीठावरील त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून व्यक्त केली होती. धरणातील पाण्याचा फुगवटा होऊ नये म्हणून हे धरण फोडून त्यातील पाणी बाहेर सोडण्यात आले. हे काम मंगळवारी (ता. २०) रात्रीपासून सुरू झाले होते.

loading image