esakal | हिंगोली जिल्ह्यातील सोळा मंडळात अतिवृष्टी, ५५.३० मिलिमीटर पाऊस
sakal

बोलून बातमी शोधा

हिंगोली : कयाधू नदी दुथडी भरून वाहत होती. समगा गावाजवळील पुल तुटला होता.

हिंगोली जिल्ह्यातील सोळा मंडळात अतिवृष्टी, ५५.३० मिलिमीटर पाऊस

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यात Hingoli सोमवारी (ता.१२) सकाळी आठ वाजेपर्यंत ५५.३० मिलिमीटर पाऊस झाला. सोळा मंडळात अतिवृष्टी झाली, तर पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या आई व मुलाचा मृतदेह आढळले. तसेच वाहून गेलेली वाहन सापडले. एक म्हैस वाहून गेली तर समगा गावाजवळील पुल वाहून गेल्याने गावाचा संपर्क तुटला. जिल्ह्यात सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ५५.३० मिलिमीटर पाऊस Rain झाला. सोळा मंडळात अतिवृष्टी झाली आहे. अनेक नदी नाल्याना पूर आला. कयाधू नदी Kayadhu River दुथडी भरून वाहत आहे. दरम्यान जिल्ह्यात मंडळनिहाय झालेला पाऊस असा (पाऊस मिलिमीटरमध्ये) ; हिंगोली ५३.५, नरसी ५१.८, सिरसम ३५.५, बासंबा ६०.५, डिग्रस ७७ ३, माळहिवरा ४१.५, खंडाळा ६०.५, तर तालुक्यात ५४.७० पाऊस झाला. कळमनुरी Kalamnuri मंडळात ४७.५ मिलीमीटर, वाकोडी २७, नांदापुर ५७.८, बोल्डा ५७.३, डोंगरकडा, वारंगा ६१ एकुण ५३.४ , वसमत Vasmat मंडळ ८२. ५, आंबा ६९.३, हयातनगर ६९, गिरगाव ६५, हट्टा ७३, टेंभुर्णी ६०.३, कुरुंदा ७०.८, तर ७० मिलिमीटर, औंढा Aundha Nagnath ६८, येहळेगाव ६८.३, साळणा ५६.३, जवळा ७३.५, एकुण ६६.५ मिलिमीटर पाऊस झाला.heavy rain in 16 revenue circles of hingoli district

हेही वाचा: आंधळ दळतयं आणि कुत्रं खातयं, चित्रा वाघ यांची गृहखात्यावर टीका

सेनगाव Sengao ४३.३, गोरेगाव ३६.५, आजेगाव ४१.३, साखरा २३.३, पानकनेरगाव ४१ हत्ता १३.५, तर एकुण ३३.७ मिलिमीटर पाऊस झाला. दरम्यान या पावसाने हिंगोली तालुक्यातील समगा गावाजवळील छोट्या पुलाचा काही भाग पुराने वाहून गेल्याने गावचा संपर्क तुटला आहे. तसेच औंढा तालुक्यातील आसोला गावाजवळ औरंगाबाद Aurangabad येथील पडोळ कुटुंबातील वर्षा पडोळ व त्यांचा मुलगा श्रेयस पुराच्या पाण्यात वाहून गेले. त्या़ंचे मृतदेह सोमवारी सापडले. सेनगाव तालुक्यातील जवळा बुद्रुक येथील शेतकरी उतम भंडारे यांची म्हैस ओढ्याला आलेल्या पुरात वाहुन गेली.

हेही वाचा: परभणीत पावसाचा कहर! पुरात अडकलेल्या बारा जणांची सुटका

वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील ओढ्याला आलेल्या पुरात कुमार शिंदे व गणेश शिंदे हे वाहनाने येत असताना पुराच्या पाण्याचा अंदाज आला नसल्याने वाहनासह वाहून गेले. दोघे वाहनातून बाहेर पडल्यावर पोहत बाहेर निघाले. त्यांचे वाहुन गेलेले वाहन सोमवारी सापडले. तसेच वसमत तालुक्यातील आकोली येथे रात्री नऊ वाजता ओढ्याला आलेल्या पूरात वसमत येथील ईलेष बच्चेवार वाहून गेले. त्यांचा जागीच मृतदेह सोमवारी प्रल्हाद कदम यांच्या शेतात सापडला.

loading image