Nigeria Accident News : नायजेरियात बोट बुडून मोठा अपघात! 26 शेतकऱ्यांचा मृत्यू

Nigeria
Nigeria

नायजेरियात बोट बुडाल्याने तब्बल 26 जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आङे. या अपघातात अनेक जण बेपत्ता झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे. नायजेरियाच्या उत्तर-मध्य भागात हा अपघात घडला. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या भागात गेल्या तीन महिन्यांतील हा दुसरा अपघात आहे. नायजेरियाचा हा भाग अतिशय मागासलेला समजला जातो.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, नायजेरियाच्या नायजर राज्याच्या गव्हर्नर प्रवक्ते बोलगी इब्राहिम यांनी सांगितले की, अपघात झालेल्या बोटीवर 100 हून अधिक लोक होते. बोटीत महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. मोकवा नावाच्या ठिकाणी हा अपघात झाला. बोट दुर्घटनेत प्राण गमावलेले व बेपत्ता झालेले लोक धरण ओलांडून आपापल्या शेतात जात होते. त्यामुळे बहुतांश लोक हे शेतकरी असल्याचे मानले जात आहे.

Nigeria
Mumbai Accident : पार्टीनंतर मरीन ड्राईव्हला जाताना भीषण अपघात; दोघा भावांचा कारमध्ये होरपळून मृत्यू, दोघे अत्यवस्थ

30 जणांची सुटका करण्यात आली

गव्हर्नरांचे प्रवक्ते बोलगी इब्राहिम यांनी सांगितले की, बोट दुर्घटनेत 26 जणांचा मृत्यू झाला असून. मृत्युमुखी पडलेल्या लोकांमध्ये बहुतांश महिला आणि लहान मुले होती. त्यांनी सांगितले की, अपघातातील सुमारे 30 जणांना वाचवण्यात यश आले आहे. नायजर राज्य आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेच्या सहकार्याने मरीन पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून पाण्यात बुडालेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे.

Nigeria
G20 Summit: ब्राझीलच्या राष्ट्रपतींवर RRR चा फिवर! तोंड भरुन केलं कौतुक तर राजामौलींनीही मानले आभार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com