Pakistan Peshawar Mosque Bomb Blast : मशिदीत बॉम्बस्फोट; ३० ठार, ५० जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pakistan Peshawar Mosque Bomb Blast

Pakistan : मशिदीत बॉम्बस्फोट; ३० ठार, ५० जखमी

Pakistan Peshawar Mosque Bomb Blast : पाकिस्तानमधील पेशावर येथे मशिदीमध्ये बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली. यामध्ये जवळपास ३० जणांचा मृत्यू झाला असून ५० जण जखमी आहेत. याबाबत एएनआयने स्थानिक माध्यमांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे.

हेही वाचा: युक्रेन ते देऊळगावराजा व्हाया रोमानिया जयेशचा थरारक प्रवास

पाकिस्तानमधील पेशावर येथे आज सकाळी मशिदीमध्ये नमाज पठण सुरू होते. त्यामुळे गर्दी होती. याचवेळी अचानक बॉम्बस्फोट झाला. त्यामुळे चेंगराचेंगरी देखील झाली. यामध्ये ३० जणांचा मृत्यू झाला असून ५० जण जखमी आहेत. तसेच १० जणांची प्रकृती गंभीर असल्याचं पेशवारच्या रिडींग रुग्णालयाचे प्रवक्ते असीम खान म्हणाले.

आत्मघातकी हल्ला? -

जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तसेच याप्रकरणाची कठोर चौकशी करणार आहोत. प्रथमदर्शनी हा आत्मघाती हल्ला होता, असे दिसते, असे एका पोलिस अधिकाऱ्यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले.

Web Title: 30 Killed Many Injured In Bomb Blast At Mosque Peshawar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pakistan
go to top