बीचवर सनबाथ पडला महागात, कडक सूर्यप्रकाशात झोपली अन् त्वचा प्लास्टिकसारखी आकसली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 plastic skin at forehead woman

बीचवर सनबाथ पडला महागात, कडक सूर्यप्रकाशात झोपली अन् त्वचा प्लास्टिकसारखी आकसली

शास्त्रीय भाषेत सूर्यकिरणांना 'व्हिटॅमिन डी'चा मोठा स्रोत असल्याचं म्हटलं जातं. सूर्यकिरणांमुळे होणारे नुकसान अनेकवेळा समोरही आलं आहे. दरम्यान, असाच एक प्रकार समोर आला असून एक महिला अर्धा तास समुद्राच्या मध्यभागी झोपली होती. उन्हाचा आनंद घेण्यासाठी या महिलेने सनक्रीम वापरली नव्हती. मात्र तिला ही चूक चांगलीच महागात पडली आहे.

बुल्गेरियातील एका बीचवर ही घटना घडली आहे. ब्रिटनमधील रहिवासी सिरीन मुराद नावाची ब्युटीशियन सुट्टी घालवण्यासाठी समुद्रकिनारी गेली होती. यावेळी ती सनस्क्रीम न लावता बीचवर उन्हाचा आनंद घेत असताना तिचे कपाळ अचानक आकसले आहे. उन्हामुळे तिचा चेहऱ्याच्या वरील भाग भाजला आहे. ही महिला ब्युटीशियन असूनही अचानक हा प्रकार का घडला हे तिलाही समजलेले नाही.

हेही वाचा: Vinayak Mete Accident: फडणवीस यांनी घोषणा केलेली एक्सप्रेस वे वरील ITMS प्रणाली आहे तरी काय?

सूर्याच्या तेजस्वी किरणांमध्‍ये सिरीनने त्वचा टॅन होऊ नये यासाठी कोणतेही कव्हर क्रीम किंवा सनक्रीम न लावली नव्हती. मात्र अर्ध्या तासानंतर तिच्या कपाळावर थोडी जळजळ जाणवायला लागली. यानंतर तिचे कपाळ लाल झाले. २१ अंश सेल्सिअस तापमानात सनस्क्रीन न लावता उन्हात झोपणे या महिलेला महागात पडले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी हा प्रकार पाहिल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

सनस्क्री न लावता बीचवर पडून राहिल्याने सकाळपर्यंत महिलेचे कपाळ आकसले होते. ब्युटीशियन असूनही त्याचे काय झाले हे मला समजलेच नाही, असंही ती म्हणाली आहे. यानंतर त्या महिलेने लगेच डॉक्टरांशी संपर्क साधला असून औषध घेतले आहे. सोशल मीडियावर महिलेला भाजलेले फोटोही शेअर झाले असून त्यात आकसलेले कपाळ दिसत आहे.

हेही वाचा: Gay Sex गुन्हा नाही, कलम 377 A लवकरच रद्द करणार; सिंगापूर PM यांची घोषणा

Web Title: 30 Minutes Wakes Up With Plastic Skin At Forehead Woman Fell Asleep In Sun

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..