Vinayak Mete Accident: फडणवीस यांनी घोषणा केलेली एक्सप्रेस वे वरील ITMS प्रणाली आहे तरी काय?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगिलेली ही सिस्टीम काय आहे, याबद्दल अधिकची खालीलप्रमाणे..
devendra fadnavis ITMS System on express way
devendra fadnavis ITMS System on express way
Updated on

हायवेवर अपघात घडल्यास त्या ठिकाणी तात्काळ मदतीसाठी अचूक लोकेशन मिळाले असून पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर इंटेलिजंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टिम (ITMS) प्रणाली बसवली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. विनायक मेटेंच्या अपघातानंतर पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर वाढत्या अपघातांकडे लक्ष वेधत त्यांनी ही घोषणा केली आहे. विनायक मेटेंच्या अपघाती निधनावर विधान परिषदे अधिवेशात चर्चेवेळी फडणवीसांनी ही माहिती दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगिलेली ही सिस्टीम काय आहे. याचा प्रवास करणाऱ्यांना काय फायदा होणार आहे. तसेच ही प्रणाली म्हणजे काय ही माहिती आपण पाहुयात.. (devendra fadnavis ITMS System on express way)

ITMS म्हणजे काय?

आयटीएमएस म्हणजे हायवेवर किंवा रस्त्यांवर एचडी कॅमेरा बसवणे होय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर ठिकठिकाणी एचडी (हाय डेफिनिशन) कॅमेरे बसवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. हे कॅमेरा ३०० मीटर अंतरावर बसवलेले असतात. यामुळे एक्सप्रेस वेवरील कोणत्याही भांगातून चालकांच्या हालचाली कॅप्चर करता येतात. शहरातील वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी आयटीएमएस ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे.

devendra fadnavis ITMS System on express way
MP : बायकोनेच घातला गंडा, लग्नानंतर युरोपचा दौरा केला अन् ५० लाख घेऊन पळाली

यंत्रणा काम कशी करते?

यामध्ये ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर (ANPR) द्वारे सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक करावाई केली जाते. 40 किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने गाडी चालवल्यास त्याला दंड केला जातो. या यंत्रणेत कॅमेऱ्यांद्वारे वाहनांची नंबर प्लेट पाहून चालकाने मोडलेला नियम रेकॉर्ड केला जातो. ज्या दिवशी नियम मोडला, त्यादिवशी तारीख आणि वेळ असलेला फोटो थेट नियंत्रण कक्षाला पाठवला जातो आणि तिथून चालकाच्या पत्त्यावर दंडासाठी ऑनलाईन कारवाई केली जाते.

दरम्यान, याआधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इंटिलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (ITMS) महापालिका संस्था असलेल्या 57 जिल्हा मुख्यालयी शहरांमध्ये लागू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शहरी व आंतरजिल्हा वाहतुकीचे प्रभावी संचालन आणि देखरेख करणे आवश्यक आहे. व्हिडीओ वॉलद्वारे वाहतुकीचे प्रभावी निरीक्षण केले जावे आणि वाहतूक कोंडी होऊ देऊ नये. यासाठी ही प्रणाली उपयोगी पडले अशी माहितीही त्यांनी दिली होती.

devendra fadnavis ITMS System on express way
मरेपर्यंत उद्धव अन् आदित्य ठाकरेंसोबत काम करणार; शिंदे गटात प्रवेशावर साळवींचं स्पष्टीकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara and Sangli Face Water Crisis as Koyna Power Generation Set to Halt
Dark monsoon clouds hovering over Kerala coast as delayed southwest monsoon shows signs of activation, while parts of Maharashtra face heatwave and pre-monsoon thunderstorms.
Sugar, Ethanol and Water Supply Take Center Stage as Maharashtra Cabinet Meets in Delhi
image-fallback
Marathi News Esakal
www.esakal.com