तब्बल तीनशे वर्षांनंतर बार्बाडोस झाला स्वतंत्र; ब्रिटनचा सूर्य अखेर मावळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तब्बल तीनशे वर्षांनंतर बार्बाडोस झाला स्वतंत्र; ब्रिटनचा सूर्य अखेर मावळला

तब्बल तीनशे वर्षांनंतर बार्बाडोस झाला स्वतंत्र; ब्रिटनचा सूर्य अखेर मावळला

ब्रिजटाउन: एकेकाळी जगावर ब्रिटनची संपूर्ण अधिकृत सत्ता होती. आता ब्रिटनची सत्ता ही काही देशांत औपचारिकतेचा भाग म्हणून राहिलेली आहे. या पार्श्वभूमीवर आज बार्बाडोस या देशाने स्वत:ला स्वतंत्र घोषित केले आहे. या घोषणेसह कॅरिबियन द्वीपकल्पातील बार्बाडोस हा ब्रिटनच्या अधिपत्यपासून स्वतंत्र होणारा ५५ वा देश ठरला आहे. त्यानुसार ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ (दुसरी) यांचे शासन संपुष्टात आलंय. आज मंगळवारी रात्री बार्बाडोस येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी ब्रिटनचे राजकुमार प्रिन्स चार्ल्स सहभागी झाले होते.

हेही वाचा: विजय मल्ल्याच्या न्यायालयीन अवमान प्रकरणी होणार सुनावणी

सँड्रा मेसन यांना ब्रिटनच्या महाराणीने बाबॉहोसच्या गर्व्हनर जनरल म्हणून नियुक्त केले होते. त्याच आता बार्बाडोसच्या अध्यक्षा बनल्या आहेत. सॅड्रा मेसन यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतलीये. त्यांनी याआधी चिली, ब्राझील, कोलंबिया आणि व्हेनेझुएला येथे राजदूत म्हणून काम केले आहे. बार्बाडोस हे १९६६ रोजीच ब्रिटनच्या गुलामगिरीतून मुक्त झाले होते. परंतु तेथील शासकीय कामकाजावर ब्रिटनच्या अमल होता. इंग्रजांनी तब्बल ३०० वर्षे बार्बाडोसवर राज्य केले आहे. एकविसाव्या शतकाच्या प्रारंभापासूनच बार्बाडोसने स्वत:ला स्वतंत्र देश म्हणून घोषित करण्याचे काम करण्यास सुरवात केली होती. यात त्यांना २०२१ मध्ये यश आलं. कॅरेबियन द्वीपकल्पात बार्बाडोस अगोदर गयाना, डोमिनिका, त्रिनिदाद, टोबॅको यांनी स्वत:ला स्वतंत्र देश म्हणून जाहीर केले आहे. बार्बाडोस हा या देशांच्या तुलनेत समृद्ध मानला जातो. कारण बार्बाडोस येथे पर्यटन व्यवसायाची भरभराट झालेली आहे. बार्बाडोसची लोकसंख्या सुमारे ३ लाख आहे.

हेही वाचा: स्वतंत्र विदर्भ होणार का? केंद्र सरकारने लोकसभेत दिलं उत्तर, म्हणाले...

वैशिष्ट्ये

  • बार्बाडोसचे स्वत:चा ध्वज आणि राष्ट्रगीत असेल

  • ३० नोव्हेंबर हा स्वातंत्र्यदिन असेल

  • अध्यक्ष सँड्रा मेसन तर पंतप्रधान मिया अमोर मोटली

  • प्रिन्स चार्ल्स यांची स्वातंत्र्य सोहळ्यात प्रमुख उपस्थिती

  • पॉप गायिका रिहानाला हीरो ऑफ बार्बाडोस रिपब्लिक असे जाहीर केले

Web Title: 300 Years Later Barbados Declares New Republic Ditches British Queen

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :britishbritish government
go to top