सौदीच्या हवाईहल्ल्यात येमेनचे ३१ नागरिक ठार

पीटीआय
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

सौदी अरेबियाच्या नेतृत्वातील फौजांनी रविवारी येमेनमध्ये केलेल्या हवाईहल्ल्यात ३० नागरिक ठार झाले असल्याची माहिती समोर आली आहे. हौथी बंडखोरांनी सौदीचे एक लष्करी विमान पाडल्यानंतर सौदीच्या लष्कराने हा हल्ला केल्याचे समोर आले आहे.

दुबई - सौदी अरेबियाच्या नेतृत्वातील फौजांनी रविवारी येमेनमध्ये केलेल्या हवाईहल्ल्यात ३० नागरिक ठार झाले असल्याची माहिती समोर आली आहे. हौथी बंडखोरांनी सौदीचे एक लष्करी विमान पाडल्यानंतर सौदीच्या लष्कराने हा हल्ला केल्याचे समोर आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सौदी लष्कराचे प्रवक्ते कर्नल तुर्की अल-मलिकी यांनी हल्ल्याचे समर्थन करताना सांगितले, की टोर्नेडो प्रकाराचे लष्करी विमान शुक्रवारी बंडखोरांनी पाडले. हे विमान सौदीच्या नेतृत्वातील सैन्याला रसद पुरवण्याचे काम करत होते. येमेनमध्ये बंडखोर आणि सौदीच्या नेतृत्वातील इतर देशांच्या लष्करांमध्ये चकमक सुरू असताना ही घटना घडल्याचे समोर आले आहे.

Coronavirus:चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक कायम; 24 तासांत 2 हजार जणांना लागण!

दरम्यान, संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार प्रमुखांनी या हल्ल्याला आश्‍चर्यजनक म्हटले आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार विभागाचे निमंत्रक लीजे गर्नाड यांनी या बाबत माहिती देताना सांगितले, की अल मस्लुब भागात सौदीने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये ३१ जण ठार झाले असून, १२ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. ठार झालेले सर्व जण सामान्य नागरिक आहेत, असेही त्यांनी या वेळी नमूद केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 31 Yemen civilians killed in Saudi airforce attack