esakal | Coronavirus:चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक कायम; 24 तासांत 2 हजार जणांना लागण!
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus updates china 2000 people affected 24 hours

कोरोनाचा सर्वाधिक फटका हुबेई प्रांताची राजधानी वुहानला बसला आहे. गेल्या चोवीस तासांत वुहानमध्ये १८४३ नवीन प्रकरणे आढळून आले आहेत.

Coronavirus:चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक कायम; 24 तासांत 2 हजार जणांना लागण!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

बीजिंग : चीनमध्ये कोरोना व्हायरसचा उद्रेक कायम असून, गेल्या चोवीस तासांत १४२ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांची संख्या आता १६६५ वर पोचली आहे. सर्वाधिक मृत हुबेई प्रांतातील आहेत. करोनाबाधित रुग्णांची संख्या ६८,५०० वर पोचली आहे. चोवीस तासांत देशभरात २००९ नवीन प्रकरणे आढळून आल्याचे चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटले आहे. मात्र करोनाचा प्रभाव कमी होत असल्याचे चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय घडलं 24 तासांत
कोरोनाचा सर्वाधिक फटका हुबेई प्रांताची राजधानी वुहानला बसला आहे. गेल्या चोवीस तासांत वुहानमध्ये १८४३ नवीन प्रकरणे आढळून आले आहेत. तेथे एकूण बाधितांची संख्या ५६,२४९ वर पोचली आहे. हुबेईत १३९ जणांचा मृत्यू झाला असून सिचुआन येथे दोन आणि हुनान येथे एकाचा मृत्यू झाला आहे. पूर्वीच्या तुलनेत आता बाधितांची संख्या कमी होत असल्याचा दावा चीनच्या वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे. यादरम्यान ९,४१९ कोरोनाबाधितांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही लागण झाली असून ती संख्या १७०० वर पोचली आहे. त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेचे पथक चीनच्या तीन प्रांताला भेट देणार असून तेथील उपचार आणि उपायांचे आकलन करण्यात येणार आहे. कोरोना संसर्गच्या प्रसाराचा परिणाम चीन आणि जगातील अनेक जागतिक परिषदांवर झाला आहे. फेसबुकच्या ९ ते १२ मार्च दरम्यान सॅन फ्रान्सिस्को येथे आयोजित केलेली ग्लोबल मार्केटिंग समिट रद्द केली तर मेलबॉर्न येथे पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक जिम्नॉस्टिक वर्ल्ड कपमध्ये चीन सहभागी होणार नाही. ऑस्ट्रेलियाने चीनच्या नागरिकांना प्रवेश करण्यास मनाई केली आहे.

आणखी वाचा - अमेरिकेच्या सैन्य तळावर इराकमध्ये रॉकेट हल्ला

आणखी वाचा - चीनमध्ये पाच लाख नागरिकांना कोरोनाची लागण होण्याचा धोका

चीनची अर्थव्यवस्था अडचणीत
कोरोना व्हायरसमुळं चीनची अर्थव्यवस्था धोक्यात आलीय. जगातील जवळपास सर्व देशांचा चीनशी व्यापार थांबला आहे. चीनमध्ये पर्यटन व्यवसायही मोठ्या प्रमाणावर चालतो. पण, त्या व्यवसायाला कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. चीनची राजधानी बीजिंग, आर्थिक राजधानी शांघाय या शहरांकडे जाणाऱ्या अनेक फ्लाईटची तिकिटे रद्द झाली आहे. जगभरातून चीनचे दौरे रद्द केले जात आहे. या सगळ्याचा परिणाम चीनच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. भविष्यात त्याचे आणखी गडद पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

loading image