येमेनमध्ये आत्मघाती हल्ल्यात 32 जण ठार

वृत्तसंस्था
रविवार, 18 डिसेंबर 2016

एडन आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ गेल्या दोन आठवड्यापूर्वी इसिसच्या दहशतवाद्यांनी असाच आत्मघाती स्फोट घडवून आणला होता. या हल्ल्यात सरकारच्या समर्थनातील 50 जवान ठार झाले होते.

एडन - दक्षिण येमेनमधील एडन शहरात रविवारी झालेल्या आत्मघाती स्फोटात 32 जवान ठार झाले असून, अनेक जण जखमी झाले आहेत.

येमेनमधील किनाऱ्यावरील शहर असलेल्या एडनमध्ये सरकारच्या समर्थनार्थ जवान एकत्र आल्याने हा आत्मघाती स्फोट घडविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. खोरमक्सार भागात ब्रिगेडीयर नासीर अन्बोरी यांच्या निवासास्थानाबाहेर गर्दी झाली असताना हा स्फोट झाला. आपले मासिक वेतन घेण्यासाठी रांग करून जवान उभे असताना हल्लेखोराने स्फोट घडविला. या हल्ल्यात मृत्यू झालेल्या जवानांपैकी जास्तीत जास्त जवान हे नव्याने भर्ती झालेले होते.

एडन आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ गेल्या दोन आठवड्यापूर्वी इसिसच्या दहशतवाद्यांनी असाच आत्मघाती स्फोट घडवून आणला होता. या हल्ल्यात सरकारच्या समर्थनातील 50 जवान ठार झाले होते. तर, 40 जखमी होते. एडन हे आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठिंबा असलेले येमेनचे अध्यक्ष अब्दु-रबू मन्सूर हादी यांच्या सरकारचे मुख्यालय आहे. 

Web Title: 32 die in suicide attack in Yemen