Coronavirus : कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतेय; आणखी 327 प्रकरणं समोर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

- चीनमध्ये आणखी 327 नवी प्रकरणं समोर.

बीजिंग : कोरोना व्हायरसने (Coronavirus) जगभरात थैमान घातले आहे. आत्तापर्यंत अडीच हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला. तर आता चीनमध्ये आणखी 327 नवी प्रकरणं समोर आली आहेत. याबाबतची माहिती राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. या  व्हायरसची लागण झालेली 327 नवीन प्रकरणं समोर आली आहेत. आत्तापर्यंत जगभरातील अडीच हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तर 23 जानेवारीच्या तुलनेत हा आकडा कमी झाल्याची माहिती दिली जात आहे. 

Image result for Coronavirus esakal

चीनमध्ये 2788 जणांचा मृत्यू

चीनमध्ये आत्तापर्यंत 2788 जणांचा मृत्यू झाला आहे. हुबेईमध्ये 41 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.  तर हुवान येथे 28 जण दगावले आहेत. 

Coronavirus : कोरोनाच्या मृतांची संख्या वाढतीये; आता...

78,824 प्रकरणांची नोंद 

चीनमध्ये आत्तापर्यंत 78,824 प्रकरणांची नोंद झाली. तर जानेवारीच्या तुलनेत हा आकडा कमी झाल्याचे सांगितले जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 327 New Cases of coronavirus toll reaches 2788

टॅग्स
टॉपिकस