सुलेमानींच्या अंत्ययात्रेत चेंगराचेंगरी, तब्बल 35 जणांचा मृत्यू; तर...

वृत्तसेवा
मंगळवार, 7 जानेवारी 2020

अमेरिकेच्या हल्ल्यात मारले गेलेले इराणचे लष्करप्रमुख कासिम सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेवेळी चेंगराचेंगरी होऊन 35 इराणी नागरिकांचा मृत्यू झाला असून, 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

तेहरान : अमेरिकेच्या हल्ल्यात मारले गेलेले इराणचे लष्करप्रमुख कासिम सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेवेळी चेंगराचेंगरी होऊन 35 इराणी नागरिकांचा मृत्यू झाला असून, 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सुलेमानी यांचा हल्ल्यातील मृत्यू हा जागतिक चर्चेचा विषय बनला असून, या घटनेमुळे आखातामध्ये अमेरिकेविरोधात प्रचंड रोष वाढला आहे. जागतिक पातळीवर या घटनेचे पडसाद पडत आहेत. आज सुलेमानी यांच्या कर्मान या मूळ गावी अंत्ययात्रेमध्ये लाखो लोक सहभागी झाले होते. या वेळी गर्दी नियंत्रणाबाहेर जाऊन चेंगराचेंगरी झाली आणि यात 35 जणांचा मृत्यू झाला. जखमी झालेल्या 50 हून अधिक जणांवर उपचार सुरू आहेत. काल तेहरानमध्ये निघालेल्या अंत्ययात्रेत दहा लाखांच्या आसपास लोक जमा झाले होते. आज जमलेल्या लोकांसमोर भाषण करताना लष्करी अधिकाऱ्यांनी अमेरिकेच्या सर्व ठिकाणांना बेचिराख करण्याचा निर्धार बोलून दाखविला.

महाविकास आघाडीच्या 'या' दोन मंत्र्यामध्ये खुर्चीवरून वाद

अमेरिकी सैनिक "दहशतवादी'
सुलेमानी यांना हल्ल्यात मारणाऱ्या अमेरिकी सैनिकांना दहशतवादी जाहीर करणारे विधेयक आज इराणच्या संसदेने मंजूर केले. या विधेयकानुसार, सुलेमानी यांच्यावरील हवाई हल्ल्यात सहभागी असलेले सर्व अमेरिकी सैनिक, त्यांचे वरिष्ठ अधिकारी, निर्णय घेणारे अमेरिकी सरकारमधील अधिकारी यांना दहशतवादी ठरविण्यात आले आहे. त्यामुळे या सर्वांना मदत म्हणजे दहशतवादाला पाठिंबा असे समजण्यात येईल, असे इराणने स्पष्ट केले आहे. इराणने गेल्याच वर्षी एप्रिल महिन्यात अमेरिकेला दहशतवादाचा पाठिराखा देश म्हणून जाहीर केले होते. त्याच कायद्यात ही सुधारणा केली आहे.

मुलीला वाजत होती थंडी; शेकोटीसाठी जाळल्या १४ कोटींच्या नोटा

पत्राचा घोळ
अमेरिकी लष्कराने इराकमधील त्यांच्या तळाला पाठविलेल्या पत्रात तेथून बाहेर पडण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले आहे. नुकसानभरपाई दिल्याशिवाय हलणार नाही, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ठणकावून सांगितल्यानंतर हे पत्र उघडकीस आल्याने आश्‍चर्य व्यक्त होते. मात्र, काही वेळातच "हे पत्र चुकून पाठविले गेले,' असा खुलासा अमेरिकेच्या लष्करातर्फे करण्यात आला. इराकमध्ये सध्या अमेरिकेचे 5200 सैनिक आहेत.

ठळक घडामोडी

  • इराकमधून काही प्रमाणात सैन्य माघारी घेणार असल्याचे जर्मनीकडून जाहीर.
  • इराणने अणुकार्यक्रम बंद केल्यास त्यांच्याशी शांतता कराराबाबत पुन्हा चर्चा करण्यास तयार असल्याचे अमेरिकेकडून जाहीर.
  • इराणला कधीही धमकावू नका, असा इराणचे अध्यक्ष हसन रोहानी यांचा अमेरिकेला इशारा

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 35 dead in crush at Suleimani burial procession