अडतीसशे वर्षांपूर्वीचे बटाट्याचे शेत

पीटीआय
बुधवार, 28 डिसेंबर 2016

टोरांटो - कोणत्याही स्वयंपाकघरात बटाटा सापडणार नाही असे होणारच नाही. उपवासाला तर आपण बटाट्याच्या पदार्थांवर ताव मारतो. पण हा बटाटा मुळचा भारतीय नाहीच. याचे मुळ पेरु देशात मानले जाते. परंतु, कॅनडामध्ये केलेल्या उत्खननात संशोधकांना नुकतेचे बटाट्याचे शेत सापडले आहे. हे शेत सुमारे 3800 वर्षांपूर्वीचे असावे असा अंदाज त्यांनी वर्तविला आहे.

'जर्नल सायन्स ऍडव्हान्सेस'च्या डिसेंबरच्या अंकात दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटिश कोलंबिया(कॅनडा) येथे वास्तव्य असणाऱ्या 'काटझी' वंशाच्या वडिलोपार्जित जमिनीवर केलेल्या उत्खननात हे लागवड क्षेत्र आढळले. त्या काळातील शिकाऱ्यांनी ही लागवड केली असावी असा प्रथम अंदाज बांधला जात आहे. 

पुरातत्व संशोधक तांजा हॉफमन आणि सायमन फ्रेसर यांनी, त्या काळात मानवाला जमीन कसण्याचे तंत्रज्ञान अवगत असल्याचे म्हटले आहे. तसेच या उत्खननात 3768 'व्हपॅटो ट्यूबर्स' म्हणजे रताळी किंवा बटाटा सदृष्य कंदमुळे सापडली आहेत. याव्यतिरिक्त सापडलेल्या कंदमुळांचे फक्त साल शिल्लक असून, ती डार्क ब्राऊन रंगाची असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Web Title: 3,800-year-old potato garden discovered in Canada

टॅग्स