SpaceXच्या 4 अंतराळवीरांचं फ्लोरिडातील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून उड्डाण

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 16 November 2020

SpaceXच्या चार अंतराळवीरांनी फ्लोरिडातील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून उड्डाण केले आहे.

फ्लोरिडा: SpaceXच्या चार अंतराळवीरांनी फ्लोरिडातील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून उड्डाण केले आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (International Space Station-ISS) प्रयाण केले आहे. ही SpaceXची व्यावसायिक क्रू मोहीम आहे, या मोहिमेला सुरुवातीला काही कारणांमुळे उशीर झाला होता.

SpaceXने चार अंतराळवीरांना (astronauts) पृथ्वीच्या कक्षेत नेले आहे आणि सुमारे 27.5 तासांच्या कक्षेत प्रवास केल्यानंतर अंतराळवीर ISSच्या गोदीत पोहचतील पुढे त्यांचा ISSमध्ये सहा महिन्यांचा मुक्काम असेल.

'इतक्यात नाहीच... कोरोनातून सावरायला आणखी वेळ लागणार'

सोमवारी पहाटे SpaceX कंपनीच्या फाल्कन 9 रॉकेटनेअटलांटिक महासागरावरून उड्डाण केलं. यामध्ये मायकल एस हॉपकिन्स, शॅनन वॉकर आणि NASAचे व्हिक्टर जे ग्लोव्हर आणि सोईची नोगुची हे जपानी अंतराळवीर आहेत.

इलॉन मस्क (Elon Musk) यांनी सुरू केलेल्या SpaceX या रॉकेट कंपनीने बांधलेल्या आणि चालवल्या जाणाऱ्या क्रू ड्रॅगन अंतराळयानाचे (Crew Dragon spacecraft) पहिले उड्डाण यशस्वी झाल्याची माहिती नासाने दिली आहे.

इव्हांका आणि जावयाच्या वागण्याचा ट्रम्प यांच्या नातवंडांना फटका; शाळेतून काढून घेण्याची वेळ

Crew-1 या नावाने ओळखले जाणारे हे प्रक्षेपण अंतराळ स्थानकावर 6 महिन्यांच्या मुक्कामासाठी चार क्रू मेंबर्सला घेऊन जाण्यासाठी नियोजित प्रवास करत आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 4 astronauts on first operational mission to space by SpaceX

टॉपिकस
Topic Tags: