'इतक्यात नाहीच... कोरोनातून सावरायला आणखी वेळ लागणार'

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 16 November 2020

आहे. जगभरातील बऱ्याच कंपन्यांच्या लशींच्या चाचण्या यशस्वी होत आहेत. पण अजूनही कोणतीच लस बाजारात आलेली नाही. 

वॉशिंग्टन: युरोपमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून तिथं रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अमेरिकेतही कोरोनाचा कहर सुरुच आहे, तिथं प्रतिदिन 2 लाखांपेक्षा जास्त रुग्ण वाढत आहेत. आता प्रत्येकाला कोरोनाची लस कधी याची चिंता आहे. जगभरातील बऱ्याच कंपन्यांच्या लशींच्या चाचण्या यशस्वी होत आहेत. पण अजूनही कोणतीच लस बाजारात आलेली नाही. 

फायझर आणि जर्मनीच्या बायोनटेकने विकसित केलेल्या कोविड-19 लसीच्या निर्मितीमध्ये समावेश असणारे उगुर साहिन यांनी पूढील हिवाळ्यापर्यंत सर्व परिस्थिती सुरळीत होईल असं सांगितले आहे.

कोरोनामुळे होतायत रक्ताच्या गुठळ्या; संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती

कोरोनाचा प्रसार कमी होईल-
बायोनटेकचे (BioNTech) मुख्य कार्यकारी अधिकारी उगुर साहिन यांनी सांगितले की, लस बाजारात आल्यानंतर त्याचा मोठा सकारात्मक परिणाम दिसेल. कोरोनाच्या प्रसारालाही आळा बसेल, प्रसारातील घट 90 टक्के जरी नसली तरी ती 50 टक्क्यांनी कमी होईल.' पावसाळ्यापुर्वी लसीकरणाचे सर्व कार्यक्रम पूर्ण होणे अत्यावश्यक आहे, असे त्यांनी रविवारी बीबीसीच्या अँड्र्यू मर शोमध्ये सांगितले.

इव्हांका आणि जावयाच्या वागण्याचा ट्रम्प यांच्या नातवंडांना फटका; शाळेतून काढून घेण्याची वेळ

रुग्णवाढीचा उच्चांक- 
अमेरिकेत कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. अमेरिकी सार्वजनिक आरोग्य संस्थांच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी देशभरात 1 लाख 77 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. फ्रान्समध्ये मागील 24 तासांत नवीन केसेस आणि मृत्यूंची संख्या झपाट्याने वाढली. फ्रान्समध्येही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. 

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BioNTech CEO Ugur Sahin Normal life will be back next winter corona