Helicopter Crash Video : दोन हेलिकॉप्टरची हवेतच धडक, चौघांचा मृत्यू; धक्कादायक व्हीडिओ

Helicopter Crash Video
Helicopter Crash Videoesakal

Helicopter Crash News : दोन हेलिकॉप्टरची हवेतच धडक झाल्याची घटना ऑस्ट्रेलियामध्ये घडली आहे. या घटनेमध्ये चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती असून घटनेचा एक व्हीडिओदेखील समोर आलेला आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये आज समुद्र किनाऱ्यावर ही घटना घडली. दोन हेलिकॉप्टर एकमेकांना धडकले. यामध्ये चार जणांचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झालेले आहेत. या अपघातानंतर एक हेलिकॉप्टर खाली कोसळलं तर दुसरं यशस्वीरित्या खाली उतरलं आहे.

अपघातग्रस्त ठिकाण क्वीन्सलँड राज्यातलं बिस्बेनपासून ४५ किलोमीटर दूर आहे. क्वीन्सलँड राज्याचे पोलिस अधिकारी गॅरी वॉरेन यांनी सांगितलं की, दोन्ही हेलिकॉप्टर गोल्ड कोस्टच्या उत्तर भागात मेन बीचवर धडकले. एक हेलिकॉ़प्टर उतरत होतं आणि दुसरं उड्डाण घेत होतं.

कोसळलेल्या हेलिकॉप्टरचा चक्काचूर झाला आहे. त्याचा मलबा दूरपर्यंत पसरला. खूप वेळेपर्यंत मृत आणि गंभीर जखमी आतमध्येच होते. त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवणं अवघड होतं, असं पोलिसांनी सांगितलं.

हेही वाचाः Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

ऑस्ट्रेलिया परिवहन सुरक्षा ब्युरोचे मुख्य आयुक्त एंगस मिशेल यांनी याप्रकरणी चौकशी होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. अपघाताचा व्हीडिओ जगभर व्हायरल झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com