पाणी कमी पडतंय म्हणून ऑस्ट्रेलिया घेणार 10 हजार उंटांचा जीव

वृत्तसंस्था
Wednesday, 8 January 2020

एकीकडे प्राण्यांना वाचविण्यासाठी प्रयात्नांची पराकाष्ठा केली जात असतानाच दुसरीकडे दक्षिण ऑस्ट्रेलियात मात्र 10 हजार उंटांना गोळ्या घालून हत्या करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

मेलबर्न : ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स राज्यातील जंगलात भीषण वणवा पेटून तब्बल 50 कोटीहून अधिक मुक्या प्राण्यांचा जीव गेला. या प्राण्यांना वाचवण्यासाठी वन्यप्रेमींनी अटोकाट प्रयत्न केले. काही प्राण्यांचे जीव वाचवण्यात ते यशस्वीही झाले. एकीकडे प्राण्यांना वाचविण्यासाठी प्रयात्नांची पराकाष्ठा केली जात असतानाच दुसरीकडे दक्षिण ऑस्ट्रेलियात मात्र 10 हजार उंटांना गोळ्या घालून हत्या करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

Australia Fire : ऑस्ट्रेलियातील आगीमुळे न्यूझीलंडचं आकाश झालं पिवळं!

ऑस्ट्रेलियन सरकार आजपासून एक अभियान सुरू करत आहेत. आजपासून पाच दिवस ऑस्ट्रेलियन सरकार 10 हजार उंटांना ठार मारण्याचे अभियान सुरू करत आहेत. या अभियानासाठी सरकारकडून हेलिकॉप्टरही पाठविण्यात आले आहेत, असे वृत्त तेथील स्थानिक वृत्तसंस्थेने दिली आहे. उंटांना का मारण्यात येणार याचे कारण ऐकले तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. 

#AustralianBushfire : शेन वॉर्न करतोय टोपीचा लिलाव; आगीतील पीडितांसाठी खेळाडू सरसावले!

दक्षिण ऑस्ट्रेलियातील काही गावांमधून गावकऱ्यांची अशी तक्रार आली की, गावातील पाणीसाठ्यावरचे सर्व पाणी उंट संपवत आहेत. दुष्काळी भाग असलेल्या या गावांमध्ये स्थानिकांना प्यायलाही पाणी नाही. त्यात उंटांना प्यायला भरपूर पाणी लागते म्हणून ते येऊन भरपूर पाणी पिऊन जातात. तसेच तेथील स्थानिक मॅरिटा बेकर हिने सांगितले की, 'गावातील पाणीसाठ्यावरील पाणी संपले असून उंट आता घराच्या दारांवर येऊन व कुंपणांवर धडका मारून स्थानिकांना त्रास देत आहेत.'

 

 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या सर्व प्रकारामुळे ऑस्ट्रेलियन सरकारने उंटांना मारण्याचे अभियान बनवले. हे अभियान साधारण नोव्हेंबरपासून आखले जात होते. आजपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. न्यू साऊथ वेल्समध्ये लागलेल्या आगीमुळे संबंध ऑस्ट्रेलिया देश भरडून निघाला आहे. तेथील तापमानही तब्बल 107.4 सेल्सिअस डिग्रीपर्यंत पोहोचले आहे. गरमीमुळे माणसांसह प्राण्यांनाही पाणी लागत आहे व देशात पाण्याची चणचण आहे, त्यामुळे सरकारने असा निर्णय घेतल्याचे सांगितले.    


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In 5 days Australia will kill 10 thousand camels