#AustralianBushfire : शेन वॉर्न करतोय टोपीचा लिलाव; आगीतील पीडितांसाठी खेळाडू सरसावले!

Australia-Bushfire
Australia-Bushfire

ऑस्ट्रेलियामधील जंगलात लागलेल्या भीषण वणव्यात जंगल, प्राणी-पक्षांची आणि एकूण पर्यावरणाची भीषण हानी झाली. मोठ्या भूभागावरील जंगल वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडल्याने प्रचंड मोठ्या हानीला ऑस्ट्रेलिया सामोरे जात आहे. 

ग्लोबल वॉर्मिंगचा सर्वात जास्त फटका ऑस्ट्रेलिया सध्या सहन करत आहे. या आगीत आतापर्यंत 23 जणांना आपला जीव गमवावा लागला असून जवळपास 50 कोटींच्यावर प्राणी-पक्षी या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत. यामध्ये कोआलांची संख्या जास्त आहे. 

इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली नैसर्गिक हानी पाहता आता खेळाडूंनी मदतीचा हात पुढे केला आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ख्रिस लीन, ग्लेन मॅक्सवेल, माजी जगप्रसिद्ध फिरकीपटू शेन वॉर्न, दक्षिण आफ्रिकेचा एबी डीव्हिलियर्स यांनी पुढाकार घेतला असून आता टेनिस क्षेत्रातील दोन दिग्गजही या कार्यासाठी पुढे आले आहेत. रशियाची स्टार टेनिसपटू मारिया शारापोव्हा आणि सर्बियाचा नोव्हाक जोकोविच यांनीही ऑस्ट्रेलियाला मदतीचा हात दिला आहे. 

सध्या ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या 'बिग बॅश लीग'च्या सामन्यांतून लीन आणि मॅक्सवेल निधी उभारत आहेत. एका षटकारामागे 250 डॉलर एवढी रक्कम यासाठी मदत म्हणून पाठवली जाणार आहे. लीनने काल तीन षटकार खेचत 750 डॉलरची मदत केल्यानंतर आज हॉबर्ट हरिकेन्सच्या डॉ ऑर्सी शॉर्टने पर्थ स्कॉचर्सविरुद्धच्या सामन्यात 70 चेंडूंत 3 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने नाबाद 103 धावांची बरसात केली. त्याने ठोकलेल्या 7 षटकारांमुळे शॉर्टने 1750 डॉलर म्हणजे सुमारे 1,26,097 रुपये इतका मदत निधी उभारला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Outstanding stuff from @lynny_50 and @gmaxi_32 

A post shared by KFC Big Bash League (@bbl) on

त्यानंतर शेन वॉर्नने आपल्या बॅगी ग्रीनचा लिलाव करण्याचे ठरवले आहे. मदत निधी उभारण्यासाठी वॉर्नने आपली कॅप विकायला काढली आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये तिसरा कसोटी सामना सुरू असताना त्याने ही घोषणा केली. ''आगीत अनेक कुटुंबांचे नुकसान झाले. विशेषत: प्राणी-पक्षांची मोठी हानी झाली. त्यामुळे या लिलावातून येणारी रक्कम पीडितांच्या कामी यावी,'' अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली. 

तसेच ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांतील खेळाडूंनी मोठा निधी जमा केला आहे. तिसऱ्या कसोटी सामन्याती प्रत्येक विकेटमागे त्यांनी एक हजार डॉलरची मदत देऊ केली आहे. 

दुसरीकडे, टेनिसपटू मारिया शारापोव्हा आणि नोव्हाक जोकोविच यांनी प्रत्येकी 25,000 ऑस्ट्रेलियन डॉलर एवढा मदतनिधी रिलीफ फंडासाठी देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com