नायजेरियात आत्मघातकी हल्ल्यात पाच ठार

वृत्तसंस्था
सोमवार, 19 जून 2017

या हल्ल्याची अद्याप कोणत्याही गटाने जबाबदारी घेतलेली नसली तरी सार्वजनिक ठिकाणी आत्मघातकी बॉंबस्फोट घडविण्यासाठी महिलांचा वापर करण्याची ही बोको हरामची पद्धत होती

मैदुगुरी (नायजेरिया) - नायजेरियाच्या बोरनो राज्यात पाच आत्मघातकी महिलांनी घडवून आणलेल्या बॉंबस्फोटात 12 जण ठार झाले, तर 11 जखमी झाले. याच राज्यात बोको हराम या दहशतवादी गटाची स्थापना करण्यात आली होती, अशी माहिती पोलिसांनी आज दिली.

या हल्ल्याची अद्याप कोणत्याही गटाने जबाबदारी घेतलेली नसली तरी सार्वजनिक ठिकाणी आत्मघातकी बॉंबस्फोट घडविण्यासाठी महिलांचा वापर करण्याची ही बोको हरामची पद्धत होती. बोरर्नो पोलिसांच्या प्रवक्‍त्याने सांगितले की, मैदुगुरीपासून आठ किलोमीटरवर असलेल्या कोफा गावात हा आत्मघातकी हल्ला सायंकाळी साडेआठच्या सुमारास झाला. सात जून रोजी बोको हराम या दहशतवादी संघटनेने केलेल्या बॉंबहल्ल्यात आणि गोळीबारात 14 जण ठार झाले होते.
 

Web Title: 5 killed in terror attack in Nigeria

टॅग्स