esakal | कोरोनापूर्वी चीनमध्ये झालेली ५० हजार प्राण्यांची विक्री; अभ्यासात खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

corona

कोरोनापूर्वी चीनमध्ये झालेली ५० हजार प्राण्यांची विक्री

sakal_logo
By
शर्वरी जोशी

कोरोना विषाणूचं मूळ उगमस्थान म्हणून आज संपूर्ण जग चीनकडे पाहत आहे. चीनच्या वुहान लॅबमध्ये कोरोना विषाणूची निर्मिती करण्यात आली आणि पाहता पाहता या विषाणूने संपूर्ण जगात आपले पाय पसरले. गेल्या दीड वर्षांपासून सुरु असलेलं या विषाणूचं तांडव अद्यापही सुरु आहे. त्यामुळे सध्या कोरोना विषाणूची उत्पत्ती कशी झाली?, कोणत्या वैज्ञानिकांमुळे झाली? अशा अनेक प्रश्नांची उत्तर मिळवण्याचा प्रयत्न जगातील अनेक देश करत आहेत. त्यातच अनेकदा या विषाणूचा फैलाव वटवाघुळ आणि pangolin या प्राण्यांमुळे झाल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, याविषयी एक नवं सत्य समोर आलं आहे. त्यानुसार, कोरोनाचा प्रसार होण्यापूर्वी चीनच्या wet market मध्ये ५०हजार प्राण्यांची खरेदी विक्री झाल्याचं समोर आलं आहे. (50000-live-animals-on-sale-in-chinas-wuhan-before-covid-19-began)

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने केलेला एक रिसर्च 'डेली मेल'मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. त्यानुसार, २०१९ च्या अखेरीस ज्यावेळी चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. त्यावेळी चीनच्या wet market मध्ये वटवाघूळ किंवा pangolin या प्राण्यांची खरेदी-विक्री न झाल्याचं समोर आलं. त्याचसोबत २०१७ ते २०१९ या काळात वुहानच्या wet market मार्केटमध्ये जवळपास ३८ प्रजातींच्या ५० हजार प्राण्यांची खरेदी-विक्री झाली होती.

हेही वाचा: Fact Check: घरगुती उपचारांमुळे कोरोना बरा होतो? सत्य आलं समोर

करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, २०१७ ते नोव्हेंबर २०१९ या काळात वुहानच्या wet market मध्ये ५० हजार प्राण्यांचा व्यवहार करण्यात आला होता. परंतु, या प्राण्यांमध्ये वटवाघुळ किंवा pangolin या दोन्ही प्राण्यांचा समावे नव्हता. यात खासकरुन civets, mink, badgers, and raccoon dogs या प्राण्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी -विक्री झाली होती. त्यावेळी या प्राण्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी होती.

दरम्यान, कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर वटवाघुळ किंवा pangolin या प्राण्यांमुळे विषाणूचा फैलाव झाल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, सध्या समोर आलेल्या माहितीच्या आधारे आता वुहानच्याच प्रयोगशाळेत कोरोना विषाणूची निर्मिती केल्याचा संशय अधिक दाट होत असल्याचं म्हटलं जात आहे.