तालिबान्यांकडून हिंसाचाराचा कहर; अफगाणी माध्यमं 'लॉकडाऊन'

taliban
taliban ft

काबुल : अफगाणिस्तानमधील (Afghanistan) परिस्थिती दिवसेंदिवस स्फोटक बनत चालली आहे. अफगानिस्तानमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून अधिक काळ तालिबानी हिंसेमध्ये वाढ झाली आहे. तालिबानने पुन्हा एकदा डोकं वर काढत उच्छाद मांडला आहे. तालिबान अफगान सैन्यासह नागरिकांच्याही कत्तली करत सुटला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांच अफगाणिस्तानमध्ये ४० नागरिकांच्या हत्या झाल्या आहेत. अमेरिकी सरकारने सैन्य वापसीची घोषणा केल्यापासून तालिबान अफगाणिस्तानच्या मोठ्या भूभागावर ताबा मिळवला आहे. सर्व क्षेत्रांमध्ये तालिबानचा हस्तक्षेप वाढला आहे. मंगळवारी रात्री तालिबानने अफगाणिस्तानचे कार्यवाहक रक्षामंत्र्यांच्या घरासमोर हल्ला केला आहे. दुसरीकडे या पार्श्वभूमीवर देशातील एकूण ५१ माध्यम कार्यालये बंद झाल्याची धक्कादायक माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. टोलो न्यूजच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिलं आहे. तिथल्या माहिती मंत्रालयाने मंगळवारी म्हटलं होतं की, आतापर्यंत ३५ माध्यमांचं कामकाज थांबलं आहे. चार टीव्ही नेटवर्क सहित १६ माध्यम कार्यालये हेलमंड प्रांतात आहेत आणि अलकिडच्या आठवड्यांमध्ये त्यांचं काम बंद झालं आहे.

taliban
मराठा आरक्षण: '५० टक्क्यांच्या मर्यादेसह १०२ वी घटनादुरुस्ती निरुपयोगी'

ज्या माध्यम कार्यालयांचं कामकाज बंद झालंय त्यांच्यामधील सहाहून अधिक माध्यमांनी तालिबानच्या समर्थनार्थ शरणागती पत्करली आहे. त्यांना तालिबानी कृत्यांच्या प्रसारासाठी वापरलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही माध्यमे हेलमंड, कंदाहार, बदखशां, बगलान, समंगन, बल्ख, सार-ए-पुल, जॉजवां, फरयाब, नुरीस्थान आणि बदगिलमध्ये सुरु आहेत.

एप्रिलपासून अफगानिस्तानात एक हजारहून अधिक रिपोर्टर आणि माध्यमकर्मीयांची नोकरी गेली आहे. यामध्ये १५० महिलांचा देखील समावेश आहे. याशिवाय गेल्या दोन महिन्यांमध्ये त्या ठिकाणी सुरु असलेल्या हिंसेदरम्यान दोन पत्रकारांचा मृत्यू देखील झाला आहे. यामध्ये भारतीय छायाचित्र पत्रकार दानिश सिद्दीकी यांचा देखील समावेश आहे. अफगानिस्तानामध्ये सुरु असलेली हिंसा ही सध्या जगाची डोकेदुखी बनली आहे. अशा पार्श्वभूमीवर तिथली पत्रकारिता अशी धोक्यात येणं, गंभीर मानलं जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com