
कराची - प्रेमाला वयाचं, दिसण्याचं किंवा गरीब श्रीमंतीचं बंधन नसतं, हे अनेक चित्रपटांमधून दाखवण्यात आलंय. अनेकदा अशी उदाहरणे आपल्या आजुबाजूला घडतही असतात. अशीच एक लव्हस्टोरी समोर आली असून ६० वर्षीय व्यक्तीने थेट २० वर्षीय तरुणीसोबत संसार थाटला आहे. तरुणी नियमीत ६० वर्षीय व्यक्तीच्या दुकाणात मेकअपचं साहित्य खरेदी करण्यासाठी येत असे. मात्र लिप्सस्टीकची लाली कधी दोघांच्या प्रेमावर चढली हे दोघांनाही कळलं नाही. 60 year old ashraf ali fell in love with 20 year old amber
ही प्रेम कहानी पाकिस्तानची असून 60 वर्षीय अश्रफ अली हे 20 वर्षीय अंबरच्या प्रेमांत अकंठ बुडाले होते. त्यानंतर दोघांनी प्रेमविवाह केला. सुरुवातीला अश्रफच्या वयामुळे अंबरच्या घरच्यांनी लग्नाला आक्षेप घेतला, पण शेवटी प्रेमाचा विजय झाला. अशरफ आणि अंबरच्या प्रेमकथेचा व्हिडिओ यूट्यूबवर व्हायरल होत आहे.
अश्रफ अली यांचे कॉस्मेटिकचे दुकान होते जे कोरोनाच्या काळात बंद झाले होते. अंबर या दुकानात लिपस्टिक, पावडर, परफ्यूम, आयलायनर खरेदी करण्यासाठी येत असे. अश्रफ यांनी सांगितलं की, अंबर जेव्हा दुकानात आली तेव्हाच मी तिला आवडलो. त्यानंतर आमची प्रेमकहानी पुढे सरकली.
अंबरने सांगितले की, ती अश्रफच्या दुकानात सौंदर्य प्रसाधने घेण्यासाठी जात नियमीत जात असे. कारण अशरफच्या दुकाणात मिळणाऱ्या वस्तूंचा दर्जा खूप चांगला होता. दुकानात झालेल्या भेटींदरम्यान दोघांमध्ये प्रेम खुललं.
अश्रफने सांगितले की, तो सर्व भावंडांमध्ये सर्वात मोठा होता. त्याने सगळ्यांची लग्ने करून दिली. फक्त त्याचे लग्न बाकी होते. यादरम्यान अंबर जेव्हा दुकानात आली तेव्हा तिला मी खूप आवडलो. विशेष म्हणजे अंबरनेच अश्रफ अलीला प्रपोज केले होते. अंबरच्या प्रस्तावाबद्दल ऐकून अश्रफ अलीला खूप आनंद झाला होता त्याच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती.
अशरफ अली यांना वयातील फरकाबाबत विचारले असता ते म्हणाले की, जेव्हा प्रेम होतं, तेव्हा वयाचा फरक पडत नाही. लोकांना हे विचित्र वाटेल पण प्रेम कोणत्याही वयात होऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.