पाकच्या ताब्यात ६०० भारतीय नागरिक उभय देशांत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाकच्या ताब्यात ६०० भारतीय नागरिक
पाकच्या ताब्यात ६०० भारतीय नागरिक

पाकच्या ताब्यात ६०० भारतीय नागरिक

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानने (India and Pakistan) आपापल्या देशातील आण्विक केंद्रे (Molecular center) आणि त्यातील सुविधांची यादी आज परस्परांना राजनैतिक माध्यमातून सुपूर्द केली. यासोबतच, आपापल्या देशात असलेल्या कैद्यांची यादी देखील दोन्ही देशांनी एकमेकांना दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयातर्फे आज याबाबतची माहिती देण्यात आली. यानुसार पाकिस्तानच्या ताब्यात सुमारे ६०० हून अधिक भारतीय नागरिक असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा: World No Tobacco Day: माझे नाव आनंद, खऱ्या अर्थाने घरी आनंद आला...

भारत आणि पाकिस्तान दरम्यान आण्विक केंद्रांच्या माहितीचे आदानप्रदान संभाव्य हल्ल्याच्या प्रतिबंधात्मक कराराअंतर्गत होत असते. याबाबतचा करार ३१ डिसेंबर १९८८ मध्ये करार झाला होता आणि त्याची अंमलबजावणी २७ जानेवारी १९९१ पासून सुरू झाली आहे. याअंतर्गत आण्विक केंद्रांची, त्यातील सुविधांची यादी वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच एक जानेवारीला दिली जाते. सर्वात पहिले आदानप्रदान १ जानेवारी १९९२ ला झाले होते. तेव्हापासून नियमितपणे यादी एकमेकांना दिली जात असून यंदाची ही ३१ वी वेळ आहे.

हेही वाचा: महिनाअखेर कोरोना रुग्णांची संख्या 2 लाखांवर जाण्याची शक्यता

भारताने इस्लामाबाद येथील भारतीय उच्चायुक्तालयातील राजनैतिक अधिकाऱ्यांमार्फत दिली. तर पाकिस्ताने दिल्लीतील उच्चायुक्तालयामार्फत भारताकडे ही यादी सुपूर्द केली. यासोबतच, दोन्ही देशांनी आपापल्या तुरुंगात असलेल्या कैदी, मच्छीमारांच्या यादीचीही देवाणघेवाण केली. कैद्यांच्या यादीचे हे आदानप्रदान २००८ मध्ये झालेल्या करारानुसार दर सहा महिन्यांनी १ जानेवारी आणि १ जुलैला होत असते. यात भारताच्या तुरुंगात असलेल्या २८२ पाकिस्तानी कैद्यांचा आणि ७३ मच्छीमारांचा तपशील पाकिस्तानला देण्यात आला. तर पाकिस्तानकडून भारताला ५१ भारतीय कैद्यांची आणि ५७७ मच्छीमारांची माहिती देण्यात आली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top