महिनाअखेर कोरोना रुग्णांची संख्या 2 लाखांवर जाण्याची शक्यता

महाराष्ट्राचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या जानेवारीअखेर दोन लाखांवर जाण्याची शक्यता वर्तविली आहे.
Corona Updates
Corona UpdatesEsakal

Coronavirus Update : महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) या आठवडाभरामध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. महाराष्ट्रात ओमिक्रॉन (Omicron) व्हेरीयंटनेही आतापर्यंत 554 रुग्ण संक्रमित झाले आहेत.महाराष्ट्र आणि प्रामुख्याने मुंबईत रुग्णवाढीचा वेग कमालीचा वाढलेला पाहायला मिळतोय. महाराष्ट्राचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास Health (Secretary Pradeep Vyas) यांनी सर्व विभागीय आयुक्त (Divisional Commissioner) आणि जिल्हाधिकाऱ्यांना (Collector) पत्र लिहिले आहे. यामध्ये जानेवारी महिन्यात राज्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या दोन लाखांच्या पार जाण्याची शक्यता वर्तविली आली आहे. (corona patients is likely to touch 2 lakh by the end of the month, Health Secretary's letter to Collector)

Corona Updates
Omicron Symptoms : ओमिक्रॉनची ही चार लक्षणे आहेत डेल्टापेक्षा वेगळी

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रशासन सध्या चिंतेत असून अलीकडे करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांमध्ये एक धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. 70 टक्के रुग्णांमध्ये डेल्टा व्हेरियंट आढळून आल्यानं प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे. राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी पत्रात म्हटले आहे की, ''राज्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे. जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सक्रिय कोरोनारुग्णांची संख्या दोन लाख पार करणार असल्याची शक्यता आहे."

Corona Updates
Omicron : बूस्टर डोस ओमिक्रॉनवर प्रभावी; संशोधनात आलं समोर

आरोग्य सचिवांनी कोरोनाच्या धोक्याचा इशारा देत म्हटलं आहे की, ''ओमिक्रॉन व्हेरियंटचा धोका नाही. ओमायक्रॉन सौम्य आहे असे समजू नका. लसीकरण न झालेल्या आणि इतर आजारांनी ग्रस्त असणाऱ्यांसाठी ओमायक्रॉन जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे कोरोनाच्या संभाव्या तिसऱ्या लाटेचा धोका अधिक असेल. यामध्ये रुग्णसंख्याही वेगाने वाढेल. त्यामुळे लसीकरणावर भर देत लसीकरण वाढवा.''

राज्यातील कोरोनारुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. गेल्या 24 तासामध्ये राज्यात आठ हजारहून अधिक नवे कोरोनारुग्ण आढळले आहेत. यामध्ये मुंबईमधून सर्वाधिक 5 हजार 631 रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com