esakal | ७ वर्षांचा मुलगा आईला देतोय घरभाडे अन् वीजबिलाचे पैसे
sakal

बोलून बातमी शोधा

rent

७ वर्षांचा मुलगा आईला देतोय घरभाडे अन् वीजबिलाचे पैसे

sakal_logo
By
टीम ई सकाळ

एका महिला नावावर आपल्या ७ वर्षाच्या मुलाकडून स्वतःच्या घराचे भाडे, वीजबिल, इंटरनेट डेटाचा खर्च घेत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मात्र, या ७ वर्षाच्या चिमुकल्याकडे इतके पैसे कुठून येतात? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्यासाठी त्याला घरातीलच लहान-मोठे कामं करावे लागतात. हे पालकत्वाच्या (parenting) नावाखाली करत असल्याचे ती महिला सांगते. मात्र, यावरून सोशल मीडियावर नवीनच वाद निर्माण झाला आहे.

हेही वाचा: आई-बाप रात्रभर मोबाईलवर खेळत होते गेम, बेडवरुन पडून चिमुकलीचा मृत्यू

संबंधित महिला ही अमेरिकेतील फ्लोरीडा येथील रहिवासी आहे. तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून तिने आपल्या पालकत्वाबाबत या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. हा ७ वर्षांचा मुलगा दररोज घरातील कामे करतो. त्यासाठी त्याच्या आईने एक टास्क लिस्ट बनविली आहे. मुलाने या यादीतील सर्व कामे पूर्ण केले, तर त्याला त्या दिवसाचे १ डॉलर (74 रुपये) मिळतात. मात्र, तो याच पैशातून महिन्याच्या शेवटी स्वतःचे बील भरतो. यामध्ये घराचे भाडे, वीजबिल, इंटरनेट डेटा हे सर्व बिल तो अदा करतो. मुलाला पैशांचं महत्व समाजावं, त्यासाठी असं वागत असल्याचं ती महिला सांगतेय. सर्व बिल भरल्यानंतर उरलेल्या पैशांमधून मुलगा त्याच्या आवडीनिवडी पूर्ण करू शकतो. पण, बिल स्वरुपात घेतलेले पैसे ती खर्च करत नाही, तर मुलाच्या बचत खात्यात जमा करते, असंही ती या व्हिडीओमध्ये सांगतेय.

महिलेच्या या पालतकत्वावरून सोशल मीडियावर एक नवीनच वाद निर्माण झाला आहे. अनेकजण महिलेचं कौतुक करत आहेत, तर काहींनी टीका देखील केली आहे. मुलाचं बालपण असं हिरावून घेऊ नये. पैसे कमविण्याचं त्याचं वय नाही, असं अनेकांचं म्हणणं आहे.

loading image
go to top