व्हायरल झालेल्या हत्तीची 'ही' आहे व्यथा...

70 Year Old Bony Elephant Was Paraded In Sri Lanka
70 Year Old Bony Elephant Was Paraded In Sri Lanka

कोलंबोः सोशल मीडियावर एका हत्तीचे छायाचित्र व्हायरल झाले असून, हत्तीचे छायाचित्र पाहून अनेकजण हळहळ व्यक्त करताना दिसत आहेत. श्रद्धेच्या नावाखाली एका 70 वर्षाच्या हत्तीनीला चालायला लावल्याची माहिती पुढे आली आहे.

'वर्ल्ड एलिफंट डे' साजरा झाल्यानंतर दोनच दिवसांनी या हत्तीचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. श्रीलंकेमध्ये परेरा फेस्टिवलचे दहा दिवसांचे आयोजन करण्यात आले होते. या फेस्टिवलदरम्यान टिकीरी नावाच्या हत्तीनीच्या शरीरावर रंगीबेरंगी वस्त्रे टाकण्यात आली होती. यामुळे या हत्तीचे मुळ शरीर झाकले गेले होते. रंगीबेरंगी वस्त्रांवर एक व्यक्ती बसून हत्तीला चालवत होता. मात्र, ही वस्त्रे काढल्यानंतर हत्तीनीचे मुळ रूप जगासमोर आले आहे.

'सेव्ह एलिफंट फाउंडेशन'ने आपल्या फेसबुक पेजवरून या हत्तीनीचे छायाचित्र व्हायरल केले आहे. फेस्टिवलदरम्यान या हत्तीनीला दहा दिवस प्रत्येक रात्री काही किलोमीटर चालवले जात होते. परंतु, वस्त्रांच्या आतमध्ये असलेल्या हत्तीनीची व्यथा कोणाला दिसत नव्हती. 'सेव्ह एलिफंट फाउंडेशन'चे संस्थापक लेक चैलर्ट यांनी म्हटले आहे की, 'श्रद्धेपोटी या हत्तीनीला काही किलोमीटर चालवले गेले आहे. या फेस्टिवलमध्ये प्राण्यांचे दुःख दिसले असून, फेस्टिवलमध्ये प्राणांच्या छळ करणे हा मूळ उद्देश नाही.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com