Philippines Earthquake : फिलीपिन्समध्ये भूकंपाचे जोरदार धक्के; रिश्टर स्केलवर 7.1 तीव्रता

फिलिपाइन्समध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत.
Philippines Earthquake
Philippines Earthquakeesakal
Summary

फिलिपाइन्समध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत.

मनिला : फिलिपाइन्समध्ये भूकंपाचे (Philippines Earthquake) जोरदार धक्के जाणवले आहेत. यूएस भूगर्भीय सर्वेक्षणानं (US Geological Survey) सांगितलं की, लुझोन बेटावर बुधवारी जोरदार भूकंप झाला. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.1 इतकी मोजण्यात आलीय.

राजधानी मनिलासह अनेक भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवल्याचं भूवैज्ञानिकांनी सांगितलं. मात्र, या धक्क्यांमध्ये कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाहीय. भूकंपाचा केंद्रबिंदू अबरा प्रांतातील डोलोरेस शहरापासून पूर्व-दक्षिण 11 किमी अंतरावर होता. 30 सेकंद किंवा त्याहून अधिक काळ भूकंपाचे धक्के जाणवले, अशी माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलीय. भूकंपाच्या धक्क्यांमुळं लोक घराबाहेर पडले आहेत.

Philippines Earthquake
कपाळाला आडवं गंध, डोळ्यात सुरमा अन् महाकालचं नाव... हीच आहे कश्यप टोळीची ओळख!

मनिला (Manila) इथंही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवल्याचं परिवहन मंत्रालयानं सांगितलं. भूकंपानंतर मेट्रो रेल्वे व्यवस्था ठप्प झाली होती. राजधानीतील सिनेटची इमारतही रिकामी करण्यात आलीय. या भूकंपामुळं अबरामध्ये नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com