

Pregnant Indian Woman Dies in Sydney After BMW Crash
Esakal
अवघ्या तीन-चार आठवड्यात घरात नव्या पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी कुटुंब उत्सुक होतं पण एका भरधाव बीएमडब्ल्यूने धडक दिल्यानं ३३ वर्षीय गर्भवतीचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. ऑस्ट्रेलियातील सिडनीत भारतीय महिलेचा मृत्यू झाला आहे. १९ वर्षीय तरुण ही कार चालवत होता अशी माहिती समोर आलीय. समन्विता धारेश्वर असं महिलेचं नाव असून ती ८ महिन्यांची गर्भवती होती. पती आणि तीन वर्षांच्या मुलासोबत फिरत असताना तिला कारने धडक दिली.