Coronavirus : चीन जाळणार तब्बल 84 हजार कोटींच्या नोटा

वृत्तसंस्था
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

चीनमध्ये 1775 जणांचा मृत्यू

बीजिंग : कोरोना व्हायरसने (Coronavirus) जगभरात अक्षरश: थैमान घातले आहे. या व्हायरसची लागण झालेल्या अनेकांना याचा फटका बसला आहे. यामध्ये आता चीनच्या चलनी नोटांचाही बळी जाणार आहे. सरकारने तब्बल 84 हजार कोटी युआन किमतीच्या नोटा जाळण्याची तयारी केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाची (Coronavirus) लागण झाल्याने हुबेईमध्ये आणखी 132 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता यातील मृतांचा आकडा वाढला आहे. तसेच 1693 नवी प्रकरणं समोर आली आहेत, याबाबतची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. तर चीनमध्ये गेल्या आठवड्यात 7400 प्रकरणं वाढली आहेत. डिसेंबर महिन्यात पहिल्यांदा येथे रुग्ण आढळला. त्यानंतर आता यातील रुग्णांची संख्या वाढत आहे. 

Coronavirus:चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक कायम; 24 तासांत 2 हजार जणांना लागण!

चीनचे पंतप्रधान शी जिनपिंग आणि ब्रिटनचे पंतप्रधान या दोन्ही नेत्यांमध्ये या मुद्यावरून फोनवरून चर्चा झाली. 

चीनमध्ये 1775 जणांचा मृत्यू

कोरोना व्हायरस या भयंकर विषाणूने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला असून, फक्त चीनमध्ये या आजारामुळे आतापर्यंत 1 हजार 775 जणांचा मृत्यू झाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 84 Thousand Crores Currency Notes of China will Destroy