VIDEO: आजी असावी तर अशी! लॉटरीवाल्याला दिली बक्षीसातील निम्मी रक्कम

VIDEO: आजी असावी तर अशी! लॉटरीवाल्याला दिली बक्षीसातील निम्मी रक्कम

एका रात्रीत आपल्याला पैशांचं घबाड सापडावं आणि आपण श्रीमंत व्हावं, असं प्रत्येकालाच वाटतं. या आशेनेच काही लोक लॉटरी काढत असतात. लॉटरी लागावी आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, असं प्रत्येकालाच वाटतं. मात्र, लॉटरी लागल्यानंतर त्यातली काही रक्कम ज्याच्याकडून आपण लॉटरी काढली आहे, त्याला तुम्ही शेअर कराल का? अर्थातच मनाचा इतका मोठेपणा क्वचितच काही लोक दाखवू शकतात. असाच मनाचा मोठेपणा एका महिलेने दाखवलाय. गेल्या बुधवारी मॅरियन फॉरेस्ट या महिलेला $300 ची लॉटरी लागली. त्यानंतर त्या महिलेने आपल्या जिंकलेल्या लॉटरीच्या रकमेतील अर्धी रक्कम त्या दुकानदाराला शेअर केली आहे.

VIDEO: आजी असावी तर अशी! लॉटरीवाल्याला दिली बक्षीसातील निम्मी रक्कम
KDCC बँकेचा निकाल वाचा एका क्लिकवर

फॉरेस्ट ही महिला जो ड्यूकच्या मिनी मार्क या दुकानाची नियमित ग्राहक आहे. तिथे कॅशियर असलेल्या वॉल्टरने लॉटरीचे तिकीट विकत घेण्याबाबत या महिलेला खात्री पटवली. वॉल्टरने तिला सांगितले की हा जॅकपॉट $500,000 रकमेचा आहे. हे लॉटरीचे तिकीट विकत घेताना फॉरेस्टने त्याला वचन दिलं होतं की, जर तिने लॉटरी जिंकली तर ती त्यानंतर "त्याचीही काळजी घेईल".

आणि झालं काहीसं तसंच! फॉरेस्टने या लॉटरीचा जॅकपॉट तर जिंकला नाही पण तिने $300 चे बक्षीस जिंकले. या बक्षिसातील अर्धी रक्कम दुकानातील वॉल्टरला देऊन त्या महिलेने तिचा शब्द पाळला. ही महिला अचानकच त्या दुकानात आली. सोबत तिने वॉल्टरचा वाटा असलेला एक लिफाफा आणला होता. तसेच त्याचे नाव असलेले फुगे घेऊन तिने वॉल्टरला आश्चर्यचा सुखद धक्का दिला.

VIDEO: आजी असावी तर अशी! लॉटरीवाल्याला दिली बक्षीसातील निम्मी रक्कम
ममता सिंधुताई कोरोना पॉझिटिव्ह

या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसंतय की, फॉरेस्टच्या अशा येण्याने वॉल्टरला सुखद धक्का बसलेला आहे आणि आश्चर्यचकित झालेला आहे. यावेळी ती म्हणताना दिसते की, "तो जगातील सर्वात गोड माणूस आहे." या सेलिब्रेशननंतर दोघांनीही मिठी मारली आणि तो क्षण साजरा केला. त्यांच्या या उत्साही सेलिब्रेशनमुळे स्टोअरमधील इतर लोक आनंदी होऊन टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करतात. त्यांचा हा व्हिडिओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला गेला आहे आणि जगभरातील लोकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com