esakal | ९/११ ची द्विदशकपूर्ती! हल्ल्यांतील मृतांना राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची आदरांजली
sakal

बोलून बातमी शोधा

JOE BIDEN OSAMA BIN LADEN

९/११ ची द्विदशकपूर्ती! हल्ल्यांतील मृतांना राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची आदरांजली

sakal_logo
By
टीम ई सकाळ

न्यूयॉर्क : अमेरिकेवर ‘अल कायदा’ने केलेल्या दहशतवादी हल्ल्याला शनिवारी २० वर्षे पूर्ण झाली. या हल्ल्यांत मरण पावलेल्यांना आज देशभरात आदरांजली वाहण्यात आली. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी ९/११मधील हल्ल्यांत अमेरिकेने गमावलेल्या दोन हजारपेक्षा जास्त नागरिकांचा सन्मान करीत एकतेच्या बळाचे महत्त्व ओळखण्याचे आवाहन देशवासीयांना केले.

हेही वाचा: चीनमध्ये गॅस सिलिंडरच्या स्फोटात आठ जणांचा मृत्यू; पाच गंभीर

बायडेन यांचे शुक्रवारी रात्री न्यूयॉर्कला आगमन झाले. त्याआधी त्यांनी सहा मिनिटांच्या एका व्हिडिओ संदेशाद्वारे मृतांना आदरांजली वाहत ‘९/११ ला दिसलेली राष्ट्रीय एकता ही अमेरिकेचे मोठे बलस्थान आहे. अपेक्षित व अनपेक्षित अशा सर्व ठिकाणी आपल्याला शौर्याचे दाखले मिळाले. राष्ट्रीय एकतेची खरी भावना जागणवणारे वेगळे, दुर्मिळ प्रसंगही आपण पाहिले,’ असे ते म्हणाले. बायडेन यांचा हा व्हिडिओ काल व्हाइट हाउसमधून प्रसारित करण्यात आला.

‘‘ ११ सप्टेंबर २००१ रोजी न्यूयॉर्क शहर, अर्लिंग्टन, व्हर्जिनिया आणि शांकव्हिले, पेनसिल्व्हेनियातील ठार झालेले ९० पेक्षा जास्त देशांमधील सुमारे तीन हजार नागरिक व जखमी झालेले एक हजार जणांच्या कुटुंबीयांसाठी आहे. अमेरिका तुमचे आणि तुमच्या प्रियजनांचे स्मरण करीत आहे. एखाद्या कमकुवत परिस्थितीतही एकता आपली सर्वांत मोठा ताकद आहे, हे या घटनेतून दिसले आहे, असेही बायडेन म्हणाले.

हेही वाचा: भळभळती जखम! दहशतवादी हल्ल्याला 20 वर्षे पूर्ण

सेवाभावाची दखल

९/११ च्या हल्ल्यांत आणि नंतर ज्यांनी आपला जीव धोक्यात घातला त्यांची आणि जे हुतात्मा झाले, अशा कर्मचाऱ्यांची त्यांनी प्रशंसा केली. अग्निशमन दल, पोलिस, डॉक्टर, परिचारिका, सामाजिक कार्यकर्ते आदी ज्यांनी बचाव, शोधकार्य व पुनर्निर्माणासाठी जीव ओतून काम केले त्यांचा सन्मान बायडेन यांनी केला.

loading image
go to top