Iran-Pakistan: इराणच्या सीमावर्ती भागात 9 पाकिस्तानी मजुरांची हत्या, दोन शेजारी राष्ट्रांमध्ये पुन्हा तणाव वाढणार?

Iran-Pakistan Tensions Rise Again: इराणच्या दक्षिण-पूर्व सीमा भागात काल(शनिवारी) अज्ञात बंदूकधाऱ्यांनी नऊ पाकिस्तानी मजुरांची गोळ्या झाडून हत्या केली. गोळीबाराचा निषेध करत पाकिस्तानच्या राजदूताने या घटनेला दुजोरा दिला आहे.
Iran-Pakistan
Iran-PakistanEsakal
Updated on

इराणने पाकिस्तानात केलेल्या हवाई हल्ल्यानंतर काही दिवसांनी दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. काल (शनिवारी) पाकिस्तानला लागून असलेल्या इराणच्या दक्षिण-पूर्व सीमा भागात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी नऊ जणांची गोळ्या झाडून हत्या केली. इराणमधील पाकिस्तानच्या राजदूताने या घटनेला दुजोरा दिला आहे. त्याचवेळी, गोळीबारानंतर घटनास्थळावरून पळून गेलेल्या तीन बंदूकधाऱ्यांचा पोलीस शोध घेत असल्याचे इराणी मीडियाने म्हटले आहे.

या घटनेबाबत पाकिस्तानचे राजदूत मुहम्मद मुदस्सीर टिपू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, सारवानमध्ये 9 पाकिस्तानींच्या हत्येमुळे खूप मोठा धक्का बसला आहे. दूतावास त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहे. आम्ही इराणला या प्रकरणी पूर्ण सहकार्य करण्याची विनंती केली आहे.

मृत मजुर ऑटो दुरुस्तीचे काम करायचे

या घटनेबाबत इराणच्या सरकारी माध्यमांनी सांगितले की, सिस्तान-बलुचिस्तान प्रांतातील सारवानमध्ये झालेल्या गोळीबाराची जबाबदारी कोणत्याही व्यक्ती किंवा गटाने स्वीकारलेली नाही. तर बलुच हक्क गट हलवॉशने आपल्या वेबसाइटवर सांगितले की, मृत पाकिस्तानी मजूर आहेत जे ऑटो दुरुस्तीच्या दुकानात काम करत होते आणि तिथे राहत होते. या घटनेत 9 पाकिस्तानी ठार झाल्याशिवाय अन्य तीन जण जखमी झाले आहेत.

Iran-Pakistan
America News : अमेरिकेत दोषीला नायट्रोजनद्वारे मृत्युदंड; शिक्षेवर मानवाधिकार आयोगाचा आक्षेप

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच म्हणाल्या की, ही एक भयानक आणि घृणास्पद घटना आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतो. आम्ही इराणी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत आणि या घटनेची त्वरित चौकशी करून संबंधितांना शिक्षा केली जाईल.

इराणचे परराष्ट्र मंत्री सोमवारी पाकिस्तानला देणार भेट

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नासेर कनानू यांनी या गोळीबाराचा निषेध केला. त्यांनी सांगितले की, ही घटना इराणचे परराष्ट्र मंत्री हुसेन अमीराबदुल्लाहियान यांच्या प्रस्तावित पाकिस्तान दौऱ्यापूर्वी घडली आहे. सोमवारी ते पाकिस्तानला जाणार आहेत. त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, इराण आणि पाकिस्तान शत्रूंना दोन्ही देशांमधील बंधुत्वाचे संबंध खराब करू देणार नाहीत.

Iran-Pakistan
'एडन'च्या खाडीत मर्चंट शिपवरील हल्ल्यानंतर भारतीय नौदल अ‍ॅक्शन मोडमध्ये; 'आयएनएस विशाखापट्टणम्' तैनात

या भागात अनेक दिवसांपासून सुरक्षा दल आणि दहशतवादी तसेच ड्रग तस्कर यांच्यात चकमक होत आहे. इराणमध्ये इंधनाचे दर जगात सर्वात कमी आहेत आणि त्यामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्येही इंधनाची तस्करी होत आहे.

Iran-Pakistan
Donald Trump Defamation Case: निवडणुकीपूर्वीच ट्रम्प यांना मोठा झटका! मानहानीच्या खटल्यात लेखिकेला ६९२ कोटी रुपये देण्याचे आदेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com