ऑनलाईन खरेदी केलं जुनं कपाट; उघडताच खरेदीदार झाला आवाक्|Global News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

One person found Rs 1 crore in an old cupboard

ऑनलाईन खरेदी केलं जुनं कपाट; उघडताच खरेदीदार झाला आवाक्

आपण सहसा ऑनलाईनद्वारे अनेक वस्तु खरेदी करतो. कधी कधी जुन्या वस्तुपण खरेदी करतो. पण जर एखादी जुनी वस्तु खरेदी केल्यानंतर त्या वस्तुमध्ये खरेदी केलेल्या वस्तुपेक्षा मोठी रक्कम मिळाली तर तुम्हाला आश्चर्याचा धक्कात बसेल. पण असे झाले आहेत.

एका व्यक्तीने ऑनलाईन जुन्या कपाटाची खरेदी केली. हे कपाट उघडून पाहिल्यानंतर त्या व्यक्तीला एक कोटीपेक्षा अधिक पैसे सापडल्याची घटना उघडकीस आली आहे. जर्मनीतील ही घटना असून सध्या सोशल मीडियावर या घटनेविषयी जोरदार चर्चा आहे. (a person found more than one crore rs in an old cupboard)

हेही वाचा: "फोन नंबर दिल्याशिवाय ट्राउझर्सदेखील...",महिला खासदाराची 'डिकेथलॉन'वर टीका

जर्मनीतील थॉमस हेलर नावाच्या व्यक्तीने किचनमध्ये सामान ठेवण्यासाठी एका जुने कपाटाची १९ हजार रुपयांमध्ये खरेदी केली होती. घरी कपाट आल्यानंतर कपाट उघडताच त्याला चक्क त्यात १ कोटी १९ लाख रुपयांची रोकड मिळाली. यात थॉमच्या प्रामाणिकतेचं कौतुक करावं तितकं कमी. या घटनेनंतर त्याने पोलीस ठाणे गाठले. आणि ते पैसे पोलिसांच्या ताब्यात दिले.

हेही वाचा: वाढत्या उष्णतेमुळे केळ्याचे उत्पादन धोक्यात

पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. तपासा दरम्यान एक वृध्द महिला या कपाटाची पहिली मालकीण असल्याचे समोर आलंय. या महिलेच्या नातवाने हे कपाट विकले होते. मात्र त्यात वृद्ध महिलेने रोकड ठेवल्याचे त्याला माहीत नसल्याचे समोर आले.

जर्मनीमध्ये हरवलेले एक हजारापेक्षा जास्त पैसे आपल्याजवळ ठेवणे गुन्हा आहे. या प्रकरणी तीन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे. थॉमसच्या प्रामाणिकतेला बघून पोलिसांनी त्याला बक्षिस दिले.

Web Title: A Person Found More Than One Crore Rs In An Old Cupboard

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :viralglobal newsGermany
go to top