Rocket Explodes : उपग्रह अवकाशात घेऊन जाणाऱ्या रॉकेटचा प्रक्षेपणानंतर काही सेकंदातच स्फोट, नेमकं काय घडलं?

या दुर्घटनेत कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही
Rocket Explodes
Rocket Explodesesakal

टोकियो : जपानचा उपग्रह अवकाशात घेऊन जाणाऱ्या पहिल्या खासगी रॉकेटचा बुधवारी प्रक्षेपणानंतर काही सेकंदातच स्फोट झाला. जपानच्या कैरोस नावाच्या रॉकेटचे डोंगराळ भागातील वाकायामा अवकाश केंद्रातून आज प्रक्षेपण झाले. पण काही सेकंदातच रॉकेटचा स्फोट झाला. स्फोटानंतर आगीचे व धुराचे प्रचंड लोट उठले. आग आटोक्यात आणण्यासाठी पाण्याचे फवारे मारण्यात आले. या दुर्घटनेत कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही आणि आग आटोक्यात आणण्यात आली असल्याचे कुशिमोटो शहरातील वाकायामा येथील अग्निशमन विभागाने सांगितले.

Rocket Explodes
Health Care News : ओठांवर वारंवार येतो घाम? काय असू शकतं कारण? जाणून घ्या उपाय

खासगी कंपनीच्या या रॉकेटच्या माध्यमातून सरकारी उपग्रह अवकाशात स्थापन करण्याची योजना होती. टोकियोतील स्टार्टअप कंपनी ‘स्पेस वन’चे हे रॉकेट होते. जपानची सरकारी वृत्तवाहिनी ‘एनएचके’ ने या उड्डाणाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात येत होते. सुरक्षित अंतरावरून उड्डाण पाहण्याची सूचना ‘एनएचके’कडून केली जात होती. रॉकेटचे हवेत पसरलेले विखुरलेले अवशेष आणि नंतर जमिनीवर पडलेले तुकडे चित्रीकरणात दिसले. या स्फोटाचे कारण अद्याप समजलेले नाही, असे या वृत्तवाहिनीने सांगितले आहे.

प्रक्षेपण अनेकवेळा रद्द

‘कैरोस’चे प्रक्षेपण यापूर्वी अनेकवेळा पुढे ढकलले होते. जपानी माध्यमांच्या माहितीनुसार रॉकेटमध्ये काही त्रुटी आढळल्याने गेल्या शनिवारी (ता. ९) उड्डाण होऊ शकले नव्हते. आजचे प्रक्षेपण यशस्वी झाले असते तर तर ‘स्पेस वन’ ही अवकाशात रॉकेट पाठविणारी पहिली खासगी कंपनी ठरली असती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com