esakal | Coronavirus : १० टेस्ट निगेटिव्ह मात्र मृत्यूनंतर रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

बोलून बातमी शोधा

coronavirus antibody report
corona : १० टेस्ट निगेटिव्ह मात्र मृत्यूनंतर रिपोर्ट आला पॉझिटिव्ह
sakal_logo
By
शर्वरी जोशी

गेल्या वर्षभरापासून प्रत्येकाच्या डोक्यावर कोरोनाची टांगती तलवार आहे. म्हणून कोरोनाची लक्षण जाणवल्यास प्रत्येक जण कोरोना (Coronavirus) चाचणी करत आहे.तसंच किरकोळ आजार झाल्यावरही प्रथम रुग्णालयात रुग्णांची कोरोना चाचणी केली जात आहे. यात कोरोना नसेल तर रिपोर्ट निगेटिव्ह येतो आणि जर कोरोनाची लागण झाली असेल तर अर्थात रिपोर्ट पॉझिटिव्ह येतो. परंतु, लंडनमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १० कोरोना चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतरही एका महिलेचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, मृत्यूनंतर त्या कोरोना पॉझिटिव्ह असल्यास समोर आलं. (a woman who has-been corona negative 10 times report positive after death)

उत्तर स्टॅनफोर्डशायर येथे राहणारी डेब्रा शॉ ( ५५) या महिलेला हर्नियाचा त्रास होता. त्यामुळे हर्नियाची शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना रॉयल स्टोक विद्यापीठाच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. शस्त्रक्रिया झाल्यानंतर डेब्रा यांना १० दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णालयातच ठेवण्यात आलं होतं. यावेळी दररोज त्याची कोरोना (covid-19) चाचणी केली जात होती. मात्र, प्रत्येक वेळी त्यांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह येत होते. परंतु, १० दिवसांनी त्यांचा अचानकपणे मृत्यू झाला. विशेष म्हणजे त्यावेळी त्यांची कोविड चाचणी केल्यावर त्यांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह (corona positive) आले.

हेही वाचा: कोरोना झाल्याचं लहान मुलांना कसं सांगाल?

डेब्रा यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना रुग्णालयात डेब्रा यांनी अखेरचं भेटण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. यावेळी डेब्रा यांना निमोनिया झाला होता, ज्यामुळे त्यांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह (corona positive) आले, असं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं. मात्र, यानंतर डेब्रा यांच्या मुलाने शॉने रुग्णालयावर आरोप केले आहेत. जर माझी आई कोरोना पॉझिटिव्ह होती, तर, १० दिवस तिचे रिपोर्ट्स निगेटिव्ह कसे काय येत होते? जर तिला कोरोना झाला असता तर आम्हाला कुटुंबियांनादेखील झाला असता असं शॉ चं म्हणणं आहे. तसंच या प्रकरणी आम्ही रुग्णालयाविरोधात कारवाई करु असंही शॉने म्हटलं आहे.