esakal | कोरोना झाल्याचं लहान मुलांना कसं सांगाल?

बोलून बातमी शोधा

कोरोना झाल्याचं लहान मुलांना कसं सांगाल?

कोरोना झाल्याचं लहान मुलांना कसं सांगाल?

sakal_logo
By
शर्वरी जोशी

गेल्या वर्षभरापासून कोरोनाने त्याच साम्राज्य चांगलंच विस्तारलं आहे. संपूर्ण जगात पाय पसरणाऱ्या या विषाणूविषयी मोठ्यांपासून लहानांपर्यंत प्रत्येकालाच माहित आहे. त्यामुळे कोरोना हा शब्द आता कोणालाही नवीन नाही.परंतु, सध्यपरिस्थितीविषयी लहान मुलांच्या (children) मनात असंख्य प्रश्न निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे अनेक मुलं त्यांच्या आई-वडिलांना विविध प्रश्न विचारुन भंडावून सोडत आहेत. यात आई-वडील देखील त्यांना शक्य होईल त्या पद्धतीने या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली तर त्याविषयी लहान मुलांना नेमकं कसं सांगावं किंवा ही गोष्ट त्यांच्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचवावी हा मोठा प्रश्न पालकांसमोर असतो. परंतु, घरात कोरोनाने शिरकाव केल्यामुळे या काळात काळजी घेणं गरजेचं आहे हे मुलांना सांगणं अत्यंत गरजेचं आहे. (coronavirus-how-talk-children-about-Coronavirus-Disease)

सध्या देशात लॉकडाउन (lockdown), नाईट कर्फ्यू, संचारबंदी, जमावबंदी, कोरोनाचा उद्रेक अशा अनेक घटना घडत आहेत. त्यामुळे लहान मुलेदेखील विविध प्रश्नांच्या माध्यमातून या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच, मुलांकडे दुर्लक्ष न करता त्यांच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणं गरजेचं आहे.

हेही वाचा: Corona Effect: काठीच्या सहाय्याने घातल्या एकमेकांना वरमाला

आपल्या घरात एखाद्या व्यक्तीला कोरोना (coronavirus) झाला तर त्याविषयी मुलांना माहिती देणं गरजेचं आहे. परंतु, मुलांना याविषयी सांगत असतांना थेट मुद्द्याला हात न घालता मुलांच्या कलाकलाने, त्यांना समजेल अशा भाषेत व अशा पद्धतीने सांगितलं पाहिजे. एखाद्या गोष्टीच्या माध्यमातून, चित्राच्या माध्यमातून मुलांना कोरोनाने आपल्या घरात शिरकाव केलाय हे सांगितलं पाहिजे. तसंच या काळात कोणती काळजी घ्यावी हेदेखील त्यांना समजावून सांगितलं पाहिजे.

दरम्यान, जर तुम्ही मुलांच्या प्रश्नांची उत्तर टाळली तर सहाजिकच मुलं (children) दुसऱ्या मार्गाने त्यांच्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतील. परिणामी, अनेकदा मुलांना चुकीची माहिती मिळते. परंतु, ते त्या गोष्टींवर विश्वास ठेवून तेच सत्य असल्याचा समज करुन घेतात. त्यामुळे पालकांनीच मुलांच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करावा. तसंच या दिवसात जास्तीत जास्त मुलांशी संवाद साधा.