अबू बक्र अल बगदादीची दहशतवाद्यांना चिथावणी

abu bakr al baghdadi
abu bakr al baghdadi

कैरो - "इसिस'चा प्रमुख अबू बक्र अल बगदादी याने एका ऑडिओद्वारे आपल्या समर्थकांना चिथावणी देत लढाई कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे.

"इसिस'च्या एका म्होरक्‍याने हा ऑडिओ प्रसिद्ध केला असून, यातील आवाज बगदादीचाच असल्याचा दावा केला आहे. शत्रू दिसेल तेथे त्याला जाळून टाका आणि शत्रूच्या प्रसिद्धी माध्यमांवर हल्ले करा, अशी चिथावणी बगदादीने दिली आहे.

दहशतवाद्यांना "खिलाफतीचे सैनिक' असे संबोधून बगदादीने त्यांची भलामणही केली आहे. बगदादी मारला गेला असल्याबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात असल्याच्या पार्श्‍वभूमीवर हा ऑडिओ प्रसिद्ध झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com