मुस्लिम राष्ट्रात दिमाखात उभे राहणार भव्य हिंदू मंदिर

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 27 January 2021

संयुक्त अरब अमिरातीतील अबु धाबीमध्ये पारंपरिक पद्धतीने भव्य अशा हिंदू मंदिराची उभारणी केली जात आहे

अबु धाबी- संयुक्त अरब अमिरातीतील अबु धाबीमध्ये पारंपरिक पद्धतीने भव्य अशा हिंदू मंदिराची उभारणी केली जात आहे.  विशेष म्हणजे या मंदिराच्या उभारणीसाठी यूएई आणि भारत या दोन्ही देशात काम केलं जात आहे. गुजरात आणि राजस्थानमधील २ हजारपेक्षा अधिक शिल्पकारांनी घडवलेल्या दगडाच्या भिंती, त्यावरील सुंदर नक्षीकाम यूएईमध्ये मंदिराच्या उभारणीसाठी पाठवलं जाणार आहे.  

BAPS स्वामीनारायण मंदिराची पायाभरणी २०२० च्या एप्रिलमध्येच झाली होती, पण कोरोना महामारीच्या संसर्गामुळे बांधकाम काही काळ थांबले होते. पण, डिसेंबर महिन्यापासून कामाने गती घेतली असून मंदिराचे काही फोटो समोर आले आहेत. यूएईमधील हे पहिल्या प्रकारचे पारंपरिक हिंदू मंदिर असून BAPS स्वामीनाराणय संस्था या मंदिराची उभारणी करत आहे. मंदिर अबु मुरेखातील अल रहबा भागात उभारलं जात आहे. पूर्व मध्य आशियातील हे पारंपरिक प्रकारचे संपूर्णपणे दगडाने बनवले जात असलेले पहिले हिंदू मंदिर आहे. 

Farmer Protest: दिल्ली हिंसाचारप्रकरणी पोलिसांकडून शेतकऱ्यांविरोधात 22 FIR

मंदिर ५५,००० चौकिमीच्या विस्तृत्व जागेवर वसवलं जात असून यात सर्वप्रकारच्या सुविधा असणार आहेत. मंदिरात सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांसाठी कॉम्प्लॅक्स असणार आहेत. कॉम्प्लॅक्समध्ये भेट देणाऱ्यांसाठी केंद्र, प्रार्थना स्थळ, प्रदर्शन, शिक्षण क्षेत्र, लहान मुलांसाठी खेळ क्षेत्र, थीमॅटिक गार्डन, फूड कोर्ट, पुस्तके आणि गिफ्ट शॉप असणार आहेत. पार्किंगसाठी मोठी जागा असणार असून त्यात १२ हजार गाड्या आरामात पार्क होऊ शकतील. तसेच २ हेलीपॅड असणार आहेत. 

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी Good News ते हिंसाचारप्रकरणी शेतकऱ्यांविरोधात FIR, वाचा...

ब्रह्मविहारी स्वामी इतर अधिकाऱ्यांसोबत मिळून BAPS हिंदू मंदिर उभारणीचं काम पाहात आहेत. स्थानिक राज्यकर्त्यांनी या मंदिराच्या उभारणीसाठी पूर्ण पाठिंबा दिला आहे. भारतामधून हातांनी घडवलेले शिल्पकाम यूएईमध्ये आणले जात आहे. यात भारताचा सांस्कृतिक इतिहास, देवी-देवता यांचे चित्रण दाखवले जाणार आहे. तसेच हिंदू धारणा आणि रामायण, महाभारतातील प्रसंग या शिल्पामधून दिसून येणार आहे.  यूएईच्या ७ राज्यकर्त्यांना दर्शवणारे सात शिखर मंदिराला असतील. मंदिराचे बांधकाम २०२० च्या दिवाळीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भारतातून अनेक लोक कामासाठी यूएईमध्ये जातात. अनेक लोक तेथेच जाऊन स्थायिक झाले आहे. यूएईच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास ३० टक्के लोक भारतीय आहेत. यूएईमधील हिंदू मंदिराच्या उभारणीमुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक विस्तारले जाणार आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abu Dhabi Hindu temple BAPS swaminarayan mandir