esakal | अबू धाबी करणार जागतिक गुंतवणूक फोरमचे आयोजन
sakal

बोलून बातमी शोधा

अबू धाबी करणार जागतिक गुंतवणूक फोरमचे आयोजन

अनेक अधिकाऱ्यांची उपस्थिती

अबू धाबी करणार जागतिक गुंतवणूक फोरमचे आयोजन

sakal_logo
By
वृत्तसंस्था

अबू धाबी : अबू धाबी येथे एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. अबू धाबी सरकारच्या अधिकाऱ्यांनी सरकारच्या प्रतिनिधी मंडळाचे स्वागत केले. या बैठकीला जागतिक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

7 वा यूएनसीटीएडी जागतिक गुंतवणूक फोरम आणि आशिया ई-कॉमर्स विक 2020 येत्या 6-10 डिसेंबरमध्ये होणार आहे. हा कार्यक्रम अबू धाबी येथे होणार असल्याचे आता निश्चित झाले आहे.

या फोरम मागचा एकच उद्देश आहे, की शाश्वत विकासासाठी गुंतवणूक व्हावी. तसेच हे एक उत्तम व्यासपीठ असल्याने जागतिक पातळीवरील चर्चा व्हावी, यासाठी प्रयत्न केले जात आहे. 

अनेक अधिकाऱ्यांची उपस्थिती

येथील अर्थ मंत्रालयाचे अधिकारी अब्दुल्ला बिन अहमद अल् सालेह, सुल्तान बिन सईद अल् मन्सूरी, मुखीसा कितूयी यांसह इतर अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती यामध्ये होती.

अब्दुल्ला यांनी सांगितले, की 7 वी द्विवार्षिक जागतिक गुंतवणूक फोरम हे एक विशेष व्यासपीठ आहे. यातून धोरण तयार करता येऊ शकेल आणि त्यासंबंधित कामकाज करता येऊ शकेल.