esakal | ‘स्वयंनिर्णयाच्या हक्काचा गैरवापर’
sakal

बोलून बातमी शोधा

‘स्वयंनिर्णयाच्या हक्काचा गैरवापर’

संयुक्त राष्ट्रांमधील उच्चस्तरीत समितीमध्ये भारताने निवेदन दिले. ‘स्वयंनिर्णयाचा हक्क या शब्दाचा चुकीचा अर्थ लावला जात असून गैरवापरही होतो आहे. संयुक्त राष्ट्रांनी वसाहतीकरणाविरोधात या हक्काचा पुरस्कार केला होता.

‘स्वयंनिर्णयाच्या हक्काचा गैरवापर’

sakal_logo
By
पीटीआय

न्यूयॉर्क - स्वयंनिर्णयाच्या हक्काचा काही देशांकडून जाणूनबुजून चुकीचा अर्थ लावला जात असून त्याचा गैरवापरही केला जात आहे, अशी टीका आज भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये केली. यावेळी भारताचा रोख पाकिस्तानकडे होता. स्वयंनिर्णयाच्या हक्काच्या नावाखाली दुसऱ्या देशाच्या हक्कावर गदा आणणे, हा अर्थ अपेक्षित नाही, असेही भारताने सांगितले.  

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संयुक्त राष्ट्रांमधील उच्चस्तरीत समितीमध्ये भारताने निवेदन दिले. ‘स्वयंनिर्णयाचा हक्क या शब्दाचा चुकीचा अर्थ लावला जात असून गैरवापरही होतो आहे. संयुक्त राष्ट्रांनी वसाहतीकरणाविरोधात या हक्काचा पुरस्कार केला होता. मात्र, आता इतर देशांच्या स्वायत्तेवर अतिक्रमण करण्यासाठी त्याचा वापर होत आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

loading image
go to top