आजीचे 'ते' छायाचित्र शेअर करणाऱ्या अभिनेत्रीवर टीका

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 जानेवारी 2017

लंडन - आपल्या आजारी आजीवर उपचार सुरू असताना लावलेल्या ऑक्‍सिजनच्या मास्कसोबत अभिनेत्री क्‍लो फेरीने छायाचित्र काढले होते. आजीच्या मृत्युनंतर तिने आजीला श्रद्धांजली वाहत हे छायाचित्र सोशल मिडियावर शेअर केले. त्यामुळे तिला प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले. टीका होत असल्याचे दिसून आल्याने तिने नंतर ही पोस्ट काढून टाकली.

"जॉर्डी शोर' या टीव्ही शोमुळे लोकप्रिय झालेली ब्रिटिश अभिनेत्री क्‍लो फेरी हिच्या आजीचे नुकतेच निधन झाले. निधनापूर्वी रुग्णालयातील उपचारादरम्यान क्‍लोने आजीसोबत छायाचित्र काढले होते. आजीच्या निधनानंतर तिला श्रद्धांजली वाहत तिने हे छायाचित्र ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर शेअर केले. हा प्रकार निर्लज्जपणा असल्याचे म्हणत नेटिझन्ससह तिच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त करत टीका केली. अनेकांनी 'हे असे छायाचित्र का पोस्ट केले आहे?' अशी विचारणा केली. त्यानंतर काही वेळाने क्‍लोने हे छायाचित्र हटविले. मात्र त्यापूर्वीच अनेकांनी तिच्यावर टीका करत या पोस्टचा स्क्रिनशॉट शेअर करत तिच्यावर टीका केली होती. "तुम्ही ट्‌विट काढून टाकले मात्र ते विसरता येणार नाही', अशी टीका एका नेटिझनने केली.

Web Title: Actress BLASTED by fans for sharing photo with her sick grandma after announcing her death