भारतीय नागरिकांना UAE मार्गे कुवेत-सौदी अरबियाला जाण्यास बंदी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 10 February 2021

तसेच नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत खाण्या-पिण्यासाठी आवश्यक ते पैसे स्वत: जवळ ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे. 

नवी दिल्ली: भारतीय नागरिकांना UAE च्या मार्गाने सौदी अरबिया आणि कुवेतला जाण्यास बंदी घातली गेली आहे. अबू धाबीमध्ये भारतीय दुतावासाने भारतीयांना UAE वरुन सौदी अरबिया आणि कुवेतकडे न जाण्याचा सल्ला दिला आहे. दुतावासाने म्हटलंय की, भारताबाहेरील प्रवासास निघण्याआधी  कोविड-19 गाईडलाइन्सबाबत जाणून घेणे आवश्यक आहे. सोमवारी अबू धाबीमध्ये भारतीय दुतावासाने एक एडव्हायझरी जाहीर करत भारतीय नागरिकांना कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी हा सल्ला दिला आहे. याशिवाय दुतावासाने नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत खाण्या-पिण्यासाठी आवश्यक ते पैसे स्वत: जवळ ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे. 

UAE मध्ये अडकले अनेक भारतीय
अबू धाबीमध्ये भारतीय दूतावासाकडून एडव्हायझरी जाहीर केली गेली आहे. यानुसार, सर्व भारतीय नागरिकांना सल्ला दिला गेलाय की, त्यांनी भारताबाहेरील प्रवास सुरु करण्याआधी कोरोनाच्या प्रोटोकॉल्सची माहिती घेणे आवश्यक आहे.  सौदी अरबिया आणि कुवेतकडे जाणारे अनेक भारतीय UAE मध्ये अडकले असल्याची माहिती मिळाली, तेंव्हा ही एडव्हायझरी जाहीर करण्यात आली आहे. 

हेही वाचा - ट्रम्प यांच्याविरोधातील दुसऱ्या महाभियोगास सुरवात; आजपासून होतेय सुनावणी

दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या प्रोटोकॉलमध्ये गतीने बदल केले गेले आहेत. सौदी अरबिया आणि कुवेतकडे जाण्यासाठी UAE मार्गाचा वापर करणे आता सुरक्षित नाहीये. ही एडव्हायझऱी दूतावासाकडून सोमवारी जाहीर केली गेली आहे. तर 2 फेब्रुवारीला सौदी अरबने भारतासमवेत 20 देशांच्या हवाई प्रवासांवर बंदी घातली आहे. कोविड-19 च्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सोबतच दूतावासाने या मार्गादरम्यान अडकलेल्या भारतीय नागरिकांना परतण्याचाही सल्ला दिला आहे. दुबईमध्ये लोकांना मोठ्या संख्येने क्वारंटाइन केले जात आहेत. तसेच जे सौदीकडे जात आहेत ते लोक अचानक नियमांमध्ये केलेल्या बदलांमुळे मार्गात अडकले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Advisory for Indian Nationals travelling to Saudi Arabia or Kuwait via UAE