Video Viral : लँड व्हायच्या आधी हवेतच उघडले विमानाचे दरवाजे; थरकाप उडवणारा व्हिडिओ

ही घटना दक्षिण कोरियामध्ये घडली आहे.
Video Viral
Video ViralSakal

दक्षिण कोरिया येथे शुक्रवारी विमानाचं लँडिंग होत असताना मोठी दुर्घटना घडली आहे. विमान लँडिग व्हायच्या आधीच विमानाचे दरवाजे उघडल्याने प्रवाशांत मोठी घाबरगुंडी उडाली. पण दरवाजा उघडल्यानंतर एकाही प्रवाशाला गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. Asiana Airlines-A321 चे हे विमान होते.

तर काही जणांना श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Video Viral
Video Viral : नवरदेवाचा भन्नाट डान्स; अख्ख्या वऱ्हाडाला नाचवलं आपल्याच तालावर

अधिक माहितीनुसार, संकटकालीन दरवाजाजवळ बसलेल्या एका व्यक्तीने दरवाजाच्या लीवरला हात लावला होता. त्यामुळे हा दरवाजा ऊघडून दुर्घटना घडली होती. या संशयातून पोलिसांनी एका ३३ वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपीची चौकशी केली आहे.

ज्यावेळी त्याने लीवरला हात लावण्याचा प्रयत्न केला त्यावेळी विमानाच्या अटेंडंडने त्याला रोखले नाही कारण विमान लवकरच लँड होणार होते. त्यावेळी तो दारूच्या नशेत नव्हता तरीही त्याने असं कृत्य का केलं यावर त्याने कोणतही उत्तर दिलं नाही. पोलिसांकडून या आरोपीची अधिक चौकशी सुरू आहे.

दरम्यान, ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यावेळी विमान जमिनीपासून २५० मीटर उंचीवर होते. या विमानात तब्बल १९४ प्रवाशी प्रवास करत होते. या विमानात ४० प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी होते. हे सर्वजण राष्ट्रीय स्पोर्ट्स स्पर्धेसाठी जात होते.

जेजू बेटावरून उड्डाण केल्यानंतर हे विमान सेऊलच्या आग्नेय दिशेला २३७ किलोमीटर अंतरावर असलेल्या डेगूला जात असताना दुपारी १२.४५ च्या सुमारास विमानाचे गेट उघडले. पण या दुर्घटनेमध्ये एकालाही गंभीररित्या दुखापत झाली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com