मेहुल चोक्सी आजही भारताचाच नागरिक; डोमिनिका कोर्टात प्रतिज्ञापत्र

PNB fraud accused Mehul Choksis Gitanjali Gems 8 other firms cant trade in shares
PNB fraud accused Mehul Choksis Gitanjali Gems 8 other firms cant trade in shares

नवी दिल्ली : फरार असलेला हिऱ्यांचा व्यापारी मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी सध्या प्रयत्न सुरु आहे. मेहुल चोक्सी हा पीएनबी घोटाळ्यातील मोठा आरोपी आहे. डोमिनिका हायकोर्टामध्ये भारताच्या परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. यामध्ये म्हटलंय की, मेहुल चोक्सीचा भारतीय नागरिकत्व सोडण्याचा अर्ज नामंजूर केला आहे. तो अद्याप देखील भारताचाच नागरिक आहे.

PNB fraud accused Mehul Choksis Gitanjali Gems 8 other firms cant trade in shares
राम मंदिर घोटाळ्यावर राहुल गांधींची टीका; म्हणाले, रामाच्या नावावर...

मेहुल चोक्सी हा भारतीय नागरिक आहे आणि भारतीय नागरिकत्व सोडण्याचा त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला आहे, असं भारतीय उच्चायुक्त कार्यालयात वाणिज्य अधिकाऱ्यांनी डोमिनिकाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. पुढे प्रतिज्ञापत्रात म्हटलंय की भारत सरकारने यापूर्वीच अँटीग्वा सरकारकडून देण्यात आलेलं मेहुल चोक्सीचं नागरिकत्व रद्द करण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.

PNB fraud accused Mehul Choksis Gitanjali Gems 8 other firms cant trade in shares
ममता बॅनर्जीचं सोशॅलिझमशी लग्न; अनोख्या विवाहाची तमिळनाडूत चर्चा

भारताने अँटीग्वा सरकारला म्हटलंय की, मेहुल चोक्सीने फसवणूक करत तिथलं नागरिकत्व प्राप्त केलं आहे. त्याने देशात केलेल्या गुन्ह्यासंदर्भात त्याची गरज आहे. मेहुल चोक्सीचं भारतीय नागरिकत्व अद्याप संपलेलं नाही. आणि भारतीय नागरिकत्व सोडून देण्याचा त्याचा दावा हा भारतातील कायद्यांच्या विरोधात असून पूर्णपणे चुकीचा आहे, असं देखील प्रतिज्ञापत्रात सांगण्यात आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com