तालिबानपासून वाचवलं, आता पोलिओपासूनही! धोका ओळखून केंद्राची घोषणा

तालिबानपासून वाचवलं, आता पोलिओपासूनही! धोका ओळखून केंद्राची घोषणा
Updated on

नवी दिल्ली : कोरोनाच्या जागतिक साथीची भीती अजूनही गेली नसताना आता अफगाणिस्तानातून तेथील नागरिकांचे स्थलांतर होत असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर पोलिओ विषाणू पसरण्याचा धोका पुन्हा वाढला आहे. त्यांची गंभीर दखल भारताने घेतली असून, पोलिओचा धोका ओळखून तेथून परतणाऱ्या लोकांचे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिओचे लसीकरण केले जाईल, असे आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी जाहीर केले आहे.

तालिबानपासून वाचवलं, आता पोलिओपासूनही! धोका ओळखून केंद्राची घोषणा
सरकारी नोकरदार महिलांनी परवानगी मिळेपर्यंत घरी रहा : तालिबान

अफगाणिस्तानातील वाढता संघर्ष, अनेक प्रांत दुर्गम असल्याने तेथे पोलिओचा मोठा धोका आहे. दक्षिण अफगाणिस्तानात सुमारे दहा लाख मुलांना गेल्या तीन वर्षांपासून लस मिळालेली नाही. लसीकरण न झालेल्या तेथील मुलांची संख्या वाढत आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान हे जगातील दोनच देश आहेत जिथे पोलिओ आहे. लसीकरणाच्या प्रयत्नांत २०१८ पासून अडचणी आल्या आहेत. कारण त्यांनी तालिबानचे वर्चस्व असलेल्या भागांत घरोघरी जाऊन लसीकरणावर बंदी घातली आहे. भारतात त्याचा धोका निर्माण होऊ नये म्हणून अफगाणिस्तानातून येणाऱ्या नागरिकांना पोलिओचे डोसही देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तालिबानपासून वाचवलं, आता पोलिओपासूनही! धोका ओळखून केंद्राची घोषणा
अफगाणिस्तानातून युक्रेनच्या विमानाचे अपहरण

अफगाणिस्तानातील सत्तांतरानंतर भारताने तेथील आपल्या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी कंबर कसली असून यासाठीच्या सुटका मोहिमेला ऑपरेशन देवी शक्ती असे नाव देण्यात आले आहे. केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आज केलेल्या ट्विटमध्ये तसा स्पष्ट उल्लेख केला आहे. अफगाणिस्तानातून आज ७८ भारतीय नागरिक विशेष विमानातून मायदेशी परतले यामध्ये २५ अफगाणी शीख आणि हिंदूंचाही समावेश होता. काबूलला लागून असणाऱ्या ताजिक शहरातून या सगळ्यांची सुटका करण्यात आली. विशेष म्हणजे याच विमानातून गुरू ग्रंथसाहिब या शिखांच्या पवित्र धर्मग्रंथांच्या तीन प्रतीही आणण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com