

काबूल : अमेरिका व उत्तर अटलांटिक करार संघटनेचे (नाटो) सैन्य जुलैमध्ये माघारी परतण्यास सुरुवात झाली तेव्हापासून सक्रिय झालेल्या तालिबान संघटनेने अफगाणिस्तान काबीज केले असून देशाचे अध्यक्षांनीही पलायन केले असून सरकार कोसळले आहे. तालिबानचे यश, कमजोर अफगाणी सैन्य आणि माफक आंतरराष्ट्रीय दबाव यामुळे बळ मिळालेल्या तालिबान्यांनी मोठ्या प्रमाणात हिंसा सुरू केलीये. तालिबानची राजवट महिलांसाठी धोकादायक मानली जाते. त्याचाच पुढचा टप्पा आज पहायला मिळत आहे.
तालिबानने अफगाणिस्तानातील सरकारी नोकरदार महिलांना परवानगी मिळेपर्यंत घरी राहण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे तालिबानकडून अनेक जुलमी फतवे जारी करण्यात आले आहेत. अफगाणिस्तानमधील महिलांना मंत्रिमंडळात स्थान देणार, त्यांनी शिक्षण घेता येईल व नोकरीही करता येईल. नागरिकांना त्रास देणार नाही, असे सकारात्मक चित्र तालिबानने गेल्या आठवड्यात रंगवले होते. पण येथील माध्यमांच्या दाव्यानुसार तालिबानच्या क्रूरतेचे दर्शन नुकतेच झाले. एक मुलगा आणि त्याच्या मित्रांनी जीन्स घातल्याने तालिबान्यांनी त्यांना मारहाण करीत अशी चूक पुन्हा न करण्याची धमकीही बंदुकीच्या धाकाने दिली.
नेलपॉलिश लावल्यास बोटे छाटणार
एका अफगाणी वृत्तपत्राने तालिबानी संघटनेची क्रूरतेची उदाहरणे दिली आहे. पारंपरिक वेश परिधान न केल्याने एका पत्रकाराला या दहशतवाद्यांनी बेदम मारले. कंदहारमध्ये तालिबानने अफगाणी महिलांसाठी फतवा काढला आहे. त्यानुसार महिलांनी नेलपॉलिश लावण्यास बंदी केली आहे. जर कोणी नेलपॉलिश लावले तर शिक्षा म्हणून त्यांची बोटे कापली जातील, अशी धमकी दिली आहे. तसेच उंच टाचेच्या सँडलवरही प्रतिबंध घातले आहेत. याचे कारण म्हणजे चालताना अशा सँडलचा आवाज होतो आणि त्यामुळे पुरुषांचे लक्ष विचलीत होते. महिलांच्या पायांचा आवाज इतर कोणाला ऐकू जाऊ नये म्हणून त्यावर बंदी आणली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीच तालिबानची वाढती ताकद हे तेथील महिलांसाठी अत्यंत भयानक गोष्ट आहे, असं मत कॅनडाच्या मॅकगिल विद्यापीठामधील मॅक्सवेल स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसीच्या ‘सेंटर फॉर ह्युमन राईट्स अँड लिगल प्लुरॅलिझम’ या केंद्रातील कायदा विभागातील सहाय्यक प्राध्यापक वृंदा नारायण यांनी व्यक्त केलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.