

Rescue teams and locals search through debris after a 6.3 magnitude earthquake struck Mazar-e-Sharif, Afghanistan
esakal
Summary
सोमवारी पहाटे अफगाणिस्तानातील मजार-ए-शरीफ येथे ६.३ तीव्रतेचा भूकंप झाला.
तालिबान प्रशासनानुसार, या भूकंपात किमान सात जणांचा मृत्यू झाला आहे.
यूएसजीएसनुसार, भूकंपाचे केंद्र २८ किमी खोलीवर मजार-ए-शरीफजवळ होते.
Earthquake News: अफगाणिस्तानातील मजार-ए-शरीफ येथे सोमवारी पहाटे जोरदार भूकंप झाला. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.३ इतकी होती. तालिबान प्रशासनाने सांगितले की या भूकंपात किमान सात जणांचा मृत्यू झाला आहे. यूएसजीएसनुसार, भूकंपाचे केंद्र मजार-ए-शरीफजवळ समुद्रसपाटीपासून २८ किलोमीटर खाली होते. किमान १५० लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे.