esakal | अफगाणिस्तानबाबत भारत-रशियाला चिंता
sakal

बोलून बातमी शोधा

Taliban-Afghanistan

अफगाणिस्तानबाबत भारत-रशियाला चिंता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि रशियाचे (Russia) राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार निकोलाय पात्रुशेव्ह यांची उद्या (ता. ८) दिल्लीत चर्चा होणार आहे. अफगाणिस्तानमधील (Afghanistan) सध्याची चिंताजनक परिस्थिती, तालिबान सरकार स्थापनेनंतर दहशतवाद वाढण्याची शक्यता यामुद्द्यांवर दोन्ही देशांची चर्चा अपेक्षित आहे.

अफगाणिस्तानबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांची २४ ऑगस्टला दूरध्वनीवरून चर्चा झाली होती. सामरिक भागीदार या नात्याने दोन्ही देशांनी अफगाणिस्तानबाबत एकत्र काम करण्याची असलेली आवश्यकता या नेत्यांच्या चर्चेतून पुढे आली होती. तसेच दोन्हीही नेत्यांनी आपापल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना परस्परांच्या संपर्कात राहण्यासही सांगितले होते.

हेही वाचा: मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल; पुण्यातून एकाला अटक!

त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक होत आहे. या भेटीनंतर निकोलाय पात्रुशेव्ह हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनाही भेटतील. रशियाचा तालिबानशी संपर्क असला तरी सरकारला मान्यता देण्याबाबत रशियाने आपले पत्ते उघड केले नाहीत. भारतातील राजदूत निकोलाय कुदाशेव यांनी काल अफगाणिस्तानबाबत भारताची आणि रशियाची चिंता एकच असल्याचे म्हटले होते.

रशियाची सूचना अन तालिबानशी संवाद

मागील महिन्यात अफगाण धोरणाबाबत रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचे विशेष दूत झमीर काबुलोव्ह हे मागील महिन्यात भारतात आले होते. या भेटीत त्यांची परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार दोवाल यांच्याशी बोलणी झाली होती. भारतानेही तालिबानशी संवाद साधावा अशी सूचना रशियाकडून झाली होती. त्यानंतर ३१ ऑगस्टला तालिबानचे राजकीय कार्यालयाचे प्रमुख शेर मोहंमद अब्बास स्तानेकझाई आणि कतारमधील भारतीय राजदूत दीपक मित्तल यांच्यात वाटाघाटींच्या रूपाने तालिबानशी पहिली औपचारिक चर्चा झाली होती.

loading image
go to top